टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री.विठ्ठल सहकारी कारखान्याला विविध मार्गांनी अंदाजे १०९ कोटी रुपये येणे बाकी आहे. हे येणे नेमके कोणाकडे आहे, किती आहे याचा शोध सुरू आहे.
याचा अंदाजे आकडा दोन हजारांच्या आसपास असून सोमवार व मंगळवारी १२५ च्या आसपास थकीत लोकांना कारखान्याकडून नोटिसा देण्यात आल्या असल्याची माहिती नुतन संचालक अभिजित पाटील यांनी दिली.
कारखान्यांशी संलग्न असलेल्या विठ्ठल सर्व सेवा संघातून अनेकांनी मोठ्या प्रमाणावर रक्कम उचलून नेल्या आहेत. या रक्कमा संबंधित लोकांकडे मागील अनेक वर्षांपासून थकल्या आहेत.
सध्या कारखान्यावर सुमारे सहाशे कोटींचे कर्ज आहे यामुळे मागील हंगामात कारखाना सुरू झाला नव्हता. विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत विजयी झालेले अभिजित पाटील यांनी कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
याचाच एक भाग म्हणून कारखान्याची थकबाकी वसुलीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासून अंदाजे दोन हजारांच्या आसपास लोकांकडे थकीत रकमा आहेत.
सोमवारपासून अशा थकबाकीदारांना टप्प्याटप्प्याने नोटिसा पाठविण्यात येत आहेत. रोज अंदाजे ६०जणांना नोटिसा पाठवल्या जात आहेत.
थकबाकी न भरणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई होणार
यामध्ये थकबाकीदार असलेल्या थकबाकी भरण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. थकबाकी न भरणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी ही कारखान्याने केल्याची माहिती नूतन संचालक अभिजित पाटील यांनी दिली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज