टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध नियंत्रणासाठी आषाढी यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रा कालावधीत शहरातील व ग्रामीण भागातील ४५० मठाधिपतींना नोटीसा काढल्यास याची माहिती उप मुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी दिली आहे.
आषाढी यात्रा सोहळा एक महिन्यांवर आला आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहर व हद्द भागामध्ये असलेल्या सर्व लहान मोठे मठ, वारकऱ्यांना भाडेतत्वावर देण्यात येणाऱ्या खाजगी इमारती यांचा सर्वेक्षण केले आहे. सध्यास्थितीत त्या ठिकाणी वास्तव्यास असणारे नागरिक व साधकांची नावे संकलित करण्यात आली आहेत.
सर्व लहान मोठे माठांचे व्यवस्थापक, वारकऱ्यांना भाडेतत्वावर देण्यात येणाऱ्या इमारतींच्या मालकांना नोटीस देण्यात आली आहे. राज्यातील व जिल्ह्यातील, परराज्यातून येणाऱ्या नागरिक साधकांना पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांच्या पूर्व परवानगी शिवाय वास्तव्यास ठेवता येणार नाही. पूर्व परवानगीशिवाय नागरिक व साधकांना वास्तव्यास ठेवल्याचे निदर्शनास आल्यास आपल्यावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे पत्र उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी दिली.
Legal action will be taken if the monastery is rented out to Warkaris; Notice to 450 abbots pandharpur
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज