टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन करण्यात आले आहे. Nine corona-infected patients on mangalwedha, 5 policemen, 2 court staff and 1 positive
मंगळवेढा तालुक्यात शनिवारी रात्री दि.25 जुलै रोजी उशिरा आणि आज रविवारी सकाळी दि.26 जुलै रोजी RT- PCR दवारे स्वब घेतलेल्या 45 लोकांचे अहवाल प्राप्त झाले आहेत.त्यापैकी 36 लोकांचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत आणि 9 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.
त्यातील 5 लोक हे पोलीस स्टेशन मंगळवेढा येथील कर्मचारी असून 3 लोक civil कोर्ट मंगळवेढा येथील आहेत. 1 जण मुलाणी गल्ली मधील आहे. या सर्वांचे contact tracing चे काम सुरू आहे.
या सर्व व्यक्तींचे विलगीकरण करण्यात येणार आहे वरील कोणाच्याही संपर्कात आलो आहे असे कोणत्याही व्यक्तींना वाटत असेल अथवा कोणाला काही कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असतील तर त्यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा अथवा तालुका आरोग्य अधिकारी मंगळवेढा यांचे यंत्रणेशी संपर्क करून आपली कोरोना साठी चाचणी करून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सद्य स्थितीत मंगळवेढा तालुक्यातील एकूण रुग्णाची संख्या 79 झाली असून सर्व बाबींची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत चालली असून कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टन्स ठेवून आरोग्य प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नगरपालिका व आरोग्य प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
—————————
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज