mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! पेपर फोडणं आता पडणार महागात; केंद्र सरकारने मध्यरात्री लागू केला नवा कायदा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 22, 2024
in राष्ट्रीय, शैक्षणिक
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

NEET आणि UGC-NET परीक्षेतील पेपर लीकमुळे संपूर्ण देशभरात गदारोळ निर्माण झाल्यानंतर भविष्यात पेपरफुटीच्या अशा घटनांना आळा घालण्यासाठी, त्या रोखण्यासाठी सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे.

केंद्र सरकारने शुक्रवारपासून एक कठोर कायदा लागू केला आहे. त्या अंतर्गत परीक्षेत होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी किमान 3 ते 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

तर पेपर लीक करणाऱ्यांना 5 ते 10 वर्षे तुरुंगवास आणि किमान 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाईल अशी तरतूद करण्यात आली आहे. संसदेने सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 हा फेब्रुवारी महिन्यात मंजूर केला होता.

परीक्षा आयोजित करणारी संस्था, सेवा पुरवठादार किंवा इतर कोणत्याही संस्थेने कोणताही संघटित गुन्हा केल्यास, त्यांना कमीत कमी 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होईल, ती 10 वर्षांपर्यंत वाढू शकते.

तसेच 1 कोटींचा दंडही होऊ शकतो. केंद्रीय
लोकसेवा आयोग (UPSC), स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC), रेल्वे, बँकिंग भरती परीक्षा आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे घेतलेल्या सार्वजनिक परीक्षांमध्ये अन्यायकारक मार्ग रोखणे हे या कायद्याचे उद्दिष्ट आहे.

मालमत्ता जप्त करण्याचीही कायद्यात तरतूद

हा दंड एक कोटी रुपयांपेक्षा कमी नसावा, असे कायद्यात म्हटले आहे. कोणत्याही संस्थेचा संघटित पेपर फुटीच्या गुन्ह्यात सहभाग आढळल्यास त्याची मालमत्ता जप्त करण्याचीही कायद्यात तरतूद आहे आणि परीक्षेचा खर्चही त्या संस्थेकडून वसूल केला जाऊ शकतो.

मात्र, हा कायदा परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना दंडात्मक तरतुदींपासून संरक्षण देतो. परीक्षेदरम्यान कोणताही उमेदवार चुकीच्या मार्गाचा वापर करताना पकडला गेला, तर त्याच्यावर परीक्षा संचालन संस्थेच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.

परीक्षेचा पेपर किंवा उत्तरे लीक करणे, उमेदवारांना अनधिकृत संवादाद्वारे परीक्षेदरम्यान मदत करणे, कॉम्प्युटक नेटवर्क किंवा इतर उपकरणांशी छेडछाड करणे, प्रॉक्सी उमेदवारांना नियुक्त करणे (डमी उमेदवार बसववणे) यासह ‘अयोग्य मार्ग’ कायद्याने प्रतिबंधित आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: नीट परीक्षा

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पुन्हा मैदानात, शेतकरी संघटनांना जरांगेंची हाक; ‘या’ तारखेला राज्यातील शेतकरी संघटना, अभ्यासकांना बैठकीसाठी घातली साद

October 25, 2025
आजचा दिवस भावंडांच्या प्रेमासाठी समर्पित! भाऊबीज मुहूर्त, पूजा आणि शुभ राशी जाणून घ्या

आजचा दिवस भावंडांच्या प्रेमासाठी समर्पित! भाऊबीज मुहूर्त, पूजा आणि शुभ राशी जाणून घ्या

October 23, 2025
आज काही राशींवर लक्ष्मीची कृपा होऊ शकते; मकर, कुंभ, मीन राशींसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Lakshmi Puja : आज दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस; लक्ष्मीपूजनाची अचूक वेळ आणि ‘या’ राशींसाठी शुभ संकेत

October 21, 2025
महत्वाची बातमी! आजपासून ‘हे’ नियम बदलले, थेट आपल्या खिशावर होणार परिणाम; जाणून घ्या

कामाची बातमी! महाराष्ट्रातील नव्या उद्योजकांसाठी खुशखबर; ‘एवढ्या’ लाखांची मदत मिळणार, ‘या’ फंडिंग’ योजना जाहीर

October 20, 2025

निष्पाप बळी! १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना, ५ वर्षाच्या मुलाला संपवलं; तपासात धक्कादायक कारण आलं समोर

October 19, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी! आता ‘या’ इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी होणार परीक्षा; शिष्यवृत्ती परीक्षेचा नियम बदलला

October 19, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

कामाची बातमी! …तोपर्यंत नोकर भरती नको, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनाबाबतही मोठी घोषणा

October 16, 2025
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या नेमक्या तारखा आणि परीक्षा दिनक्रम

October 14, 2025
दुर्दैवी घटना! घरातून पळून जाऊन प्रेमविवाह करणाऱ्या प्रेमी युगूलासह चौघांचा अपघाती मृत्यू

खळबळ! प्रियकरासोबत मुलगी पसार, आई-वडिलांनी मुलीचं श्राद्ध घातलं; पंगतीही उठल्या, भावपूर्ण श्रद्धांजलीचा बॅनल लावला

October 12, 2025
Next Post
Government Job! सरकारी नोकरीची संधी, थेट मुलाखतीद्वारे भरती; असा करा अर्ज

Job update! मंगळवेढ्यात करिअर घडवण्याची मोठी संधी; 'या' मोठ्या कंपनीत अकाउंटंट पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया सुरू

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पणासाठी आज सायंकाळी तातडीची बैठक

छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण मनोज जरांगे-पाटलांच्या हस्तेच करा; सकल मराठा समाज आक्रमक

October 26, 2025

खळबळ! अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील भाच्या विरुध्द गुन्हा दाखल

October 26, 2025
निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी संपूर्ण ताकद लावणार; सत्ता आणण्यासाठी जीवाचं रान करणार; अनिल सावंत यांनी फुंकले नगरपालिकेचे रणशिंग..

निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी संपूर्ण ताकद लावणार; सत्ता आणण्यासाठी जीवाचं रान करणार; अनिल सावंत यांनी फुंकले नगरपालिकेचे रणशिंग..

October 25, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पणासाठी आज सायंकाळी तातडीची बैठक

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पणासाठी आज सायंकाळी तातडीची बैठक

October 25, 2025
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात पिकपच्या धडकेत दुचाकीवरील एकुलत्या एक मुलासह दोघांचा मृत्यू; मृतामध्ये संगणक अभियंत्याचा समावेश

October 25, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पुन्हा मैदानात, शेतकरी संघटनांना जरांगेंची हाक; ‘या’ तारखेला राज्यातील शेतकरी संघटना, अभ्यासकांना बैठकीसाठी घातली साद

October 25, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा