टीम मंगळवेढा टाईम्स ।
काका आता म्हातारे झालेत, पक्ष वाढीसाठी तरुणांना संधी द्या, पक्ष अशा कागाळ्या वर करणाऱ्यांना वैतागून मी राजीनामा दिला होता. मात्र, माझ्यानंतर कोण ? असा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा तुम्हीच पदावर राहा , असे मला सांगण्यात आले.
काम साधून घेण्यासाठी कोणत्याही पातळीला जाणाऱ्यामुळे पक्षाचे नुकसान होत असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी सांगितले.
लांबोटीचे दिवंगत जिल्हा परिषद सदस्य तानाजी खताळ यांचे चिरंजीव अक्षय खताळ यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश कार्यक्रमात वडाळा येथे ते बोलत होते.
राजकारणात मतलबी व पुढे पुढे करणारे लोक आपला हेतू साध्य करण्यासाठी कोणतीही पातळी गाठत आहेत. अशांवर पक्ष नेतृत्वाने विश्वास ठेवू नये , असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी सांगितले.
राजकारणात चांगल्या अन् वाइटाची किंमत एकच केली, तर ते समाजहितासाठी धोक्याचे ठरणारे आहे, असेही काका म्हणाले.
स्वर्गीय तानाजी खताळ व आमचे चांगले संबंध होते, खताळ घराण्याची काँग्रेसची विचारसरणी होती, याची आठवण करून देत ‘अक्षय सोबत आमचा बाळराजे व अजिंक्यही असेल , असे सांगितले.
वडिलांनी आम्हाला यापुढे राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे, असे सांगितले होते, आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोमाने काम करू , असे अक्षय खताळ यांनी सांगितले.
यावेळी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी नवख्याला १५ दिवसांत आमदार करण्याची ताकद राजन पाटील यांच्यात असल्याचे सांगितले.
यावेळी सोलापूर बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे , राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अविनाश मार्तडे , राष्ट्रवादी मोहोळ तालुकाध्यक्ष प्रकाश चौरे, उत्तरचे अध्यक्ष प्रल्हाद काशीद , सज्जन पाटील, जयदीप साठे आदींची उपस्थिती होती.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज