mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शरद पवार सांगोला दौऱ्यावर; गणपतराव देशमुखांच्या कुटुंबीयांची सांत्वन घेणार भेट

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 8, 2021
in राज्य
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी केले जनतेला मोठे आवाहन!

टीम मंगळवेढा टाईम्स। 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सांगोला दौऱ्यावर आहेत. दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट ते घेणार आहेत.

तब्बल 50 वर्ष राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून आपली कारकीर्द गाजवलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं 30 जुलै रोजी निधन झालं. गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शरद पवार अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नव्हते.

त्यामुळे सांगोल्यात जाऊन शरद पवार हे गणपतराव देशमुख यांच्या घरी जातील. तिथे त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील. गणपतराव देशमुखांच्या निधनानंतर विविध पक्षीयांनी शोक व्यक्त केला होता. पवारांनीही ट्विटरवरुन गणपतरावांना श्रद्धांजली अर्पण केली होती.

गणपतराव देशमुख 11 वेळा आमदार

गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी झाला. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतराव देशमुख यांनी तब्बल 54 वर्षे सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.

एकाच मतदारसंघातून विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून 11 वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळवले.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे आबासाहेब देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले.

आबासाहेब देशमुखांनी सांगोल्यातून सगळ्यात पहिल्यांदा 1962 च्या निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर 1972 आणि 1995 या दोन पंचवार्षिक वगळता प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सांगोल्यातील जनतेने त्यांच्या निस्सीम प्रेम केलं.

गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले त्यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यानंतर 1999 मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.

राहणीमानामुळे सर्वाधिक लोकप्रिय

गणपतराव देशमुख हे त्यांच्या साध्या राहणीमानामुळे सर्वाधिक लोकप्रिय होते. 11 वेळा आमदार राहूनही त्यांची राहणीमान अत्यंत साधी राहिली आहे. एसटी आणि रेल्वेने प्रवास करणारा आमदार म्हणूनही त्यांच्याबद्दल राज्यातील नागरिकांना नेहमीच कुतुहूल वाटायचे. त्यामुळेच त्यांच्या साधी राहणीमानाची नेहमीच चर्चा व्हायची.

माणदेशाच्या माळावर गुराढोरांच्या संगतीत राबणाऱ्या माणसाचा नेता अशी त्यांची ख्याती होती. सांगोला तालुक्यासाठी उजनी धरणातून पाणी आणण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला होता. त्यांच्या संघर्षामुळेच सांगोल्याला उजनीचे पाणी मिळू शकले.

केवळ दोनदा पराभव

शेतकरी कामगार पक्ष राज्यात प्रभावहीन झाला आहे. तरीही देशमुख यांनी सांगोला मतदारसंघ राखला. या मतदारसंघातून ते तब्बल 11 वेळा निवडून आले. 1962 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवणाऱ्या देशमुखांना केवळ 1972 आणि 1995 मध्ये त्यांचा पराभव झाला. 1972 मध्ये काकाळासाहेब साळुंखे-पाटील यांनी त्यांचा पराभव केला. तर 1995मध्ये काँग्रेसचे शहाजीबापू पाटील यांनी त्यांना पराभूत केले. हे दोन पराभव वगळता देशमुख यांनी सातत्याने विजय मिळवला आहे. मात्र, प्रकृती आणि वय या दोन कारणामुळे 94 वर्षीय देशमुख यांनी 2019ची विधानसभा निवडणूक लढवली नाही.

अधिककाळ विरोधी बाकावर

गणपतराव देशमुख सर्वाधिक काळ विधानसभेत राहिले असले तरी बहुतेक काळ ते विरोधी पक्षातच होते. 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केले. त्यावेळी देशमुखांचा मंत्रिमंडळात समावेश झाला.

त्यानंतर 1999 मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला. तेव्हाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. हा अपवाद वगळता ते नेहमी विरोधी पक्षातच राहिले.

तर मुख्यमंत्री झाले असते.

पुण्याच्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूची 5वी युवा संसद जानेवारी 2020मध्ये पार पडली. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी एक किस्सा सांगितला. 1999मध्ये मुख्यमंत्री कोणाचा होणार असा पेच निर्माण झाला. कारण आम्हाला पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं. त्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार की भाजपचा होणार अशी चर्चा सुरू होती. पण बहुमत नसल्याने आमदार आपल्यासोबत येणार नाहीत, हेही दिसत होते.

ADVERTISEMENT

त्यावेळी शेकापचे तीन आमदार निवडून आले होते. तेव्हा गोपीनाथ मुंडेही मुख्यमंत्री नको आणि नारायण राणेही मुख्यमंत्री नको. गणपतराव देशमुखांना मुख्यमंत्री करा. असा विचार आला. त्यावर सर्व सहमतही होते. पण नंतर ते झालं नाही, असा गौप्यस्फोट पाटील यांनी केला होता.

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: गणपतराव देशमुखशरद पवारसांगोला
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

मी शपथ घेतो की… 18 आमदार शपथबद्ध, सर्व कॅबिनेट मंत्री; आता 20 जणांचे असणार मंत्रिमंडळ

यादी समोर! 15 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार; पालकमंत्रीही हेच राहणार?

August 11, 2022
Breaking! पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यांत ‘या’ कारणांसाठी जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार

मोठी बातमी! राज्यात पाेलीस दलात २९ हजार पदे रिक्त; पदे भरण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत डेडलाइन

August 11, 2022
शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

Breaking! मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

August 11, 2022
दत्तात्रय भरणे औकातीत राहायचं, उजनीसुद्धा ओलांडू देणार नाही; आमदार तानाजी सावंत यांचा इशारा

मोठी बातमी! नामदार तानाजी सावंत यांना ‘हे’ खात मिळणार; मंत्रिपदाने मंगळवेढ्यात जल्लोष

August 10, 2022
मी शपथ घेतो की… 18 आमदार शपथबद्ध, सर्व कॅबिनेट मंत्री; आता 20 जणांचे असणार मंत्रिमंडळ

मी शपथ घेतो की… 18 आमदार शपथबद्ध, सर्व कॅबिनेट मंत्री; आता 20 जणांचे असणार मंत्रिमंडळ

August 9, 2022
पंढरपूरच्या ‘या’ आश्रमात 32 वारकऱ्यांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू; जेवणात बासुंदीही होती

भ्रमनिरास! सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश आमदार मतदारसंघात; ‘हे’ आमदार मात्र मुंबईकडे मार्गस्थ

August 9, 2022
मोठी बातमी! भाजपचे धक्कातंत्र; आज एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

ठरलं तर! आज ‘या’ आमदारांना मुख्यमंत्री कार्यालयातून फोन जाणार; मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी?

August 8, 2022
अभिमानास्पद! सोलापूरचे सुपुत्र होणार सरन्यायाधीश, आता सुप्रीम कोर्टाचा कारभार मराठी माणसाच्या हाती; ‘या’ तारखेला स्वीकारणार पदभार

अभिमानास्पद! सोलापूरचे सुपुत्र होणार सरन्यायाधीश, आता सुप्रीम कोर्टाचा कारभार मराठी माणसाच्या हाती; ‘या’ तारखेला स्वीकारणार पदभार

August 7, 2022
मंगळवेढेकरांना डे-नाईट सामन्याची मेजवानी; शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

धक्कादायक! क्रिकेटच्या मैदानात झाला आयुष्याचा खेळ; बॉल लागल्याने पंढरपुरातील तरुणाचा मृत्यू

August 7, 2022
Next Post
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

गावची सुरक्षा ग्रामसुरक्षा दलाच्या हाती; मंगळवेढ्यातील मंदिरावर आता सायरन व सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार

ताज्या बातम्या

मी शपथ घेतो की… 18 आमदार शपथबद्ध, सर्व कॅबिनेट मंत्री; आता 20 जणांचे असणार मंत्रिमंडळ

यादी समोर! 15 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार; पालकमंत्रीही हेच राहणार?

August 11, 2022
मंगळवेढ्यात शैक्षणिक वर्तुळात खळबळ; जुगार खेळतांना शिक्षक सापडला

बडे मासे गळाला! मंगळवेढ्यात हॉटेलच्या पाठीमागे सुरु असलेल्या दोन जुगार अड्ड्यावर छापा; सर्वात मोठी कारवाई

August 11, 2022
Breaking! पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यांत ‘या’ कारणांसाठी जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार

मोठी बातमी! राज्यात पाेलीस दलात २९ हजार पदे रिक्त; पदे भरण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत डेडलाइन

August 11, 2022
शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

Breaking! मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

August 11, 2022
मंगळवेढ्यात पाण्याच्या टँकर मागणीचा प्रस्ताव दाखल; आमदार समाधान आवताडेंनी बोलावली ‘या’ गावांची बैठक

देवांना साकडे! मंगळवेढ्यातील ‘या’ गावात पावसासाठी ग्रामदैवतांना घातला जलाभिषेक

August 11, 2022
उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

अनेक पिके पाण्याअभावी कात टाकत आहेत, उजनीतील अतिरिक्त पाणीसाठा मंगळवेढ्यातील गावांसाठी द्या; आ.आवताडेंची मागणी

August 11, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा