टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्याप्रमाणावर पक्षप्रवेश सुरूवात झाली आहे. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी गळती लागलेल्या राष्ट्रवादीत आता दररोज इनकमिंग सुरु आहेत.
यामध्ये आता सोलापूरमधील एमआयएम पक्षाचे नेते तौफिक शेख यांच्यासह इतर नगरसेवकांची भर पडली आहे.सोलापूर महानगरपालिकेतील दहापैकी सहा नगरसेवक तौफिक शेख यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
तर उर्वरित चार नगरसेवकांनीही पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एमआयएमचे पालिकेतील संख्याबळ दहावरून थेट शून्यावर जाणार आहे.
यानंतर आता ‘एमआयएम’च्या गढीला खिंडार पाडल्यानंतर आता सोलापूर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेलाच धक्का दिला जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीने सोलापूर महानगरपालिकेतील शिवसेनेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनाच गळाला लावल्याची चर्चा आहे. त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश आता जवळपास निश्चित मानला जात आहे.
2019 ला शिवसेनेने तिकीट नाकारल्यामुळे बंडखोरी करत शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली.महेश कोठे यांना 21 नगरसेवकांपैकी शिवसेनेच्या 19 नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचे वृत्त आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज