मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । राज्यात अभूतपूर्व बदल करून सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा एकदा नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीत नियुक्त्यांवरून पुन्हा नाराजी असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षाच्यावतीने केलेल्या नियुक्तीवरून राष्ट्रवादी आणि सेनेत नाराजी असल्याचं बोललं जात आहे. NCP and Shiv Sena are angry with Congress party
महामंडळाच वाटप अजूनही प्रलंबित असताना ऊर्जा खात्यातील संबंधित पारेषण, निर्मिती या कंपन्यांमधील संचालक मंडळावर अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात आली. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी या नेमणुका केल्या आहेत. पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेने या नेमणुकांना विरोध केला आहे.घटक पक्षांशी विचारविनिमय न करता नेमणूक केल्यानं शिवसेना आणि राष्ट्रवादीत नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे विचारात न घेता केलेल्या नेमणुका रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याआधी मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या राष्ट्रवादीच्या खात्यातील मंत्री अनिल देशमुख यांनी केल्या होत्या. त्याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. त्यामुळे आता काँग्रेसच्या मंत्र्यांनी कोणालाही विश्वासात न घेता बदल्या केल्याने नाराजी पसरली आहे. यावर आता तिन्ही पक्षात काय खलबतं होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीची सत्ता आल्यामुळे सर्वाधिक मतं असलेला भाजप हा विरोधी पक्षात गेला. त्यामुळे सेनेवर नाराज असलेला भाजप आता महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीचे दिवाळीनंतर दिवाळे काढण्याचा प्लॅन भारतीय जनता पक्षाने आखला आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये सत्तापालट करण्याकरिता भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीनिशी तयार होत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे भारतीय जनता पक्षाला सत्तापलट करण्यात रस नाही. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा मुहूर्त निश्चित करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
महाविकास आघाडीला सुरुंग लावण्याचे दिल्ली दरबारी नियोजन सुरू झाले आहे. दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत जवळपास पन्नास मिनिटे प्रथमता चर्चा केली त्यानंतर अमित शहा यांनी फडणवीस यांना जेवणासाठी आमंत्रण दिले.अमित शहा यांच्या डिनर डिप्लोमसी मागे राज्यातील महाविकास आघाडीला सुरूंग लावण्याची नियोजन तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
—————————
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज