टीम मंगळवेढा टाईम्स ।
गेल्यावर्षी कांतारा देखावा पाहण्यासाठी सर्वाधिक गर्दी झालेल्या शहरातील सराफ गल्ली येथील नव महाराष्ट्र तरुण मंडळाने यंदा महिषासुर जंगल व वधाचा देखावा सादर करण्यात येणार असून त्यासाठी जय्यत तयारी सुरू असून याबरोबर शहरातील इतर मंडळाचे देखाव्याची काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे.
नवरात्र महोत्सवात विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबवण्यामध्ये आघाडीवर असलेल्या नवमहाराष्ट्र नवरात्र मंडळाचे यंदा ५३ वे वर्ष असून यापूर्वी
या मंडळांनी पुष्कर मंदिर, केदारनाथ मंदिर, श्रीराम मंदिर, जलमंदिर, कांतारा जंगल यासह वेगवेगळे देखाव्याचे सादरीकरण केले. केदारनाथ मंदिरावर केलेली बर्फवृष्टी, कांतारा जंगल देखावा जिल्ह्यात लक्षवेधक ठरला.
यंदाच्या नवरात्र महोत्सवात अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांच्या पुढाकारातून महिषासुर वधाचा देखाव्याचे सादरीकरण करण्यात येणार असून यामध्ये २००० स्क्वेअरफूट जागेमध्ये जंगल निर्मिती, देखाव्यामध्ये वीस हजार झाडे, डोंगर,गुहा आणि 6 धबधबे यामध्ये दाखवण्यात येणार असल्याची माहिती प्रशांत गडकर यांनी दिली आहे.
पुणे कोल्हापूर सांगली येथील कामगाराबरोबर प्रशांत गायकवाड, महादेव दुबळे, मारुती शेळके (सांगली), झाडे पुणे नर्सरी, मंडप तानाजी वाडेकर (भाळवणी), लाइट दिनकर जाधव, साउंड मनोज कर्नेकरअन्य कलाकारांना प्राचारण करण्यात आले असून गणेशोत्सवापासून या देखाव्याची निर्मितीसाठी कलाकार प्रयत्न करीत आहेत.
पाचव्या दिवशी खण ओटीचा कार्यक्रम कोल्हापूर महालक्ष्मी सजीव देखावा दाखविण्यात येणार येणार आहे गतवर्षी कांतारा जंगल पाहण्यासाठी भाविकांची रांग दोन किलोमीटरवर गेली होती त्यामुळे यंदा बॅरिगेट करण्यात आले असून पोलीसासह खाजगी स्वयंसेवकाचा बंदोबस्त देण्यात करण्यात आला.(स्रोत:सकाळ)
मिरवणुकीसाठी ‘हे’ आकर्षण राहणार
मंडळांनी आतापर्यंत विविध प्रबोधनाचे उपक्रम राबवले, गतवर्षीच्या नवरात्र महोत्सवात जंगलातील सफरीचा आनंद दिला. यंदाही महिषासुर वधाचाचा सजीव देखाव्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. तर मिरवणुकीसाठी राजस्थानी नृत्यविस्कार, दक्षिण भारतीय कलाकार, तुळजाभवानीची 16 फुटी मुर्ती, संभाजी महाराज देखाव्याचे आकर्षण राहणार आहे.- प्रशांत गायकवाड, अध्यक्ष, नवमहाराष्ट्र नवरात्र मंडळ
गर्दीच्या ठिकाणी काळजी घ्यावी
यंदाचा गणेशोत्सव डीजे मुक्त वातावरणात पार पाडला त्याच वातावरणात नवरात्र महोत्सव देखील पार पाडण्यात यावा देखावे पाहण्यासाठी ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या नागरिक व महिलांनी आपल्याकडे असणाऱ्या ऐवजाची गर्दीच्या ठिकाणी काळजी घ्यावी काही संशयास्पद वाटल्यास तात्काळ पोलीसाशी संपर्क साधावा. नवरात्र महोत्सवासाठी देखील होमगार्ड व पोलीस अधिकाऱ्याच वाढीव बंदोबस्त तैनात केला.- दत्तात्रय बोरीगिड्डे, पोलीस निरीक्षक मंगळवेढा
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज