मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला गुरुवार, १९ फेब्रुवारीपासून प्रारंभ झालेला आहे. सन १९९५ नंतर तब्बल तीस वर्षांनी रमजान महिना फेब्रुवारीत आला आहे. यामुळे उन्हाची तीव्रता कमी जाणवणार असून, पवित्र रोजे उपवास सुसह्य होणार आहेत.
रमजान म्हणजे प्रार्थना, संयम व इबादतीचा पवित्र महिना म्हणून ओळखला जातो. पहाटेच्या सहरपासून रात्री उशिरापर्यंत मशिदीमध्ये नमाज, कुराण पठन आणि इबादतीसाठी भाविकांची गर्दी दिसून येत आहे.

मुस्लीम समाजात वर्षातील १२ महिन्यांपैकी रमजान महिना सर्वांत पवित्र मानला जातो. याच महिन्यात पवित्र धर्मग्रंथ कुराण अवतरला असल्याचे मानले जाते.

इस्लाम धर्मातील पाच फर्ज कर्तव्यापैकी रोजा, उपवास हा एक महत्त्वाचा घटक असून, प्रत्येक प्रौढ मुस्लीम स्त्री-पुरुषातर रमजान महिन्यात ३० रोजा करणे बंधनकारक आहे.

रोजा ठेवल्यानंतर १४ ते १५ तास अन्न-पाण्याविना राहावे लागते. गेल्या काही वर्षांपासून रोजा उन्हाळ्यात येत असल्याने उपवास करणे आव्हानात्मक ठरत होते.
मात्र, यंदा फेब्रुवारीत रोजा आल्याने रोजेदारांना काहीसा दिलासा मिळणार आहे. दुसरीकडे यंदाच्या रमजानवर महागाईचे सावट असल्याचे चित्र आहे. पेंड, खजूर, खारीक, खोबरे, काजू, बदाम, शेवई, चारोळी आदी वस्तूंच्या किमती वाढल्याने खर्चात वाढ झाली आहे.

रमजान उपवासाचे तीन अशरे (टप्पे)
रमजान महिन्यात तीन अशरे (टप्पे) असतात आणि प्रत्येक टप्प्याचे वेगळे महत्त्व आहे. पहिला टप्पा ‘रहमत’ -अल्लाहची कृपा, दुसरा ‘मगफिरत’ -पापाची माफी आणि तिसरा ‘जहन्नुम से निजात’ नरकातून मुक्ती असा मानला जातो. या काळात मुस्लीम बांधव इच्छा खरेदीलाही प्रारंभ करतात. अनेक जण संपूर्ण महिनाभर इबादतीत मग्न राहतात

नमाज व धार्मिक आचरण…
रमजान काळात दिवसातून पाच वेळा नमाज अदा केली जाते. फजर, जोहर, असर, मगरीप व ईशा. ईशाच्या नमाजनंतर तरावीहच्या नमाजला विशेष महत्त्व असते. बहुतांश नमाज मशिदीत अदा केल्या जातात.

इस्लाम धर्मातील कलमा, नमाज, रोजा, जकात आणि हाज ही पाच आद्य कर्तव्ये मानली जातात. त्यापैकी नमाज, रोजा आणि जकात या तिन्हीचा विशेष संबंध रमजानशी आल्याने या महिन्याचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














