टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरात महाराष्ट्र शासनातर्फे उभारण्यात येणाऱ्या जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक निर्मितीसाठी स्थापन करण्यात आलेल्या
“स्मारक कृती समितीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ ” आणि वीरशैव लिंगायत समाजबांधवांची व्यापक बैठक आज रविवारी आयोजित करण्यात आली आहे.
समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या बैठकीत नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत.
महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या माध्यमांतून एक नेत्रदीपक पर्यटन केंद्र म्हणून मंगळवेढा शहराचे लौकिक वाढविण्यासाठीचे नियोजन या बैठकीत करून त्याविषयीचे ठराव पारित करण्यात येणार आहेत.
तसेच पुढील वाटचालीची चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.
या बैठकीस आमदार प्रशांत परिचारक,मंगळवेढयाचे आमदार समाधान दादा आवताडे,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश दादा वानकर,
माजी पालकमंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे सर,नगराध्यक्षा अरूणाताई माळी,युवा नेते भगीरथ दादा भालके,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड.नंदकुमार पवार,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा.पी.बी.पाटील,भाजपाचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल,
शिवसेना तालुकाप्रमुख तुकाराम कुदळे ही प्रमुख मंडळी उपस्थित राहणार आहेत.
स्मारक कृती समितीच्या या पहिल्याच बैठकीसाठी मंगळवेढा शहर आणि तालुक्यासह इतर भागातून समाजबांधव येणार आहेत.
विविध वीरशैव लिंगायत संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहून महात्मा बसवेश्वरांचे स्मारक जलद गतीने उभारण्याबाबत भूमिका मांडणार आहेत.
सदरची बैठक वीरशैव मंगल कार्यालय, काशी-जंगमवाडी मठ,पंढरपूर रोड,मंगळवेढा येथे आज रविवार दिनांक 13 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या महत्वाच्या बैठकीस समाजबांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डाॅ.बसवराज बगले आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज