मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । प्रतिवर्षी ४ ते ११ मार्च हा कालावधी राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताह म्हणुन साजरा करण्यात येत आहे.भैरवनाथ शुगर वर्क्स लि.,युनिट नं 3 , लवंगी साखर कारखान्यावर राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहाचे आयोजन चेअरमन प्रा . शिवाजीराव सावंत व व्हा.चेअरमन अनिल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस कारखान्याचे जनरल मॅनेजर रविंद्र साळुखे व जनरल मॅनेजर ( प्रोसेस ) तसेच सर्व खातेप्रमुख यांच्या शुभहस्ते भैरवनाथच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले .
जनरल मॅनेजर ( प्रोसेस ) अनिल पोरे यांनी उपस्थित कर्मचा – यांना सुरक्षिततेविषयी उपस्थित कर्मचा – यांना राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षेचे महत्व व संकल्पना याबाबत सविस्तर माहीती दिली . तसेच एच . आर . मॅनेजर संजय राठोड यांनी कारखान्यातील कामगारांना सुरक्षिततेची शपथ दिली . सदर प्रसंगी कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी शिवाजी चव्हाण , ऊस पुरवठा अधिकारी कृष्णदेव लोंढे , ऊस पुरवठा अधिकारी जमीर काझी , , फायनान्स अकौंटंट देवानंद पासले , ईलेक्ट्रिक इंजिनिअर राजाराम कोरे , कार्यालय अधीक्षक अभिजीत पवार , मकेनिकल इंजिनिअर अमित जाधव , सुरक्षा अधिकारी प्रकाश कमळे , स्टोअर किपर दत्तात्रय गाडे , सिव्हील इंजिनिअर इर्षाद पाटील , सुहास जाधव , अक्षय थिटे , संतोष आवताडे , , राहुल पवार , अशोक निकम , इन्स्ट्में ट इंजिनिअर सूरज झगडे , सि . मॅन्युकेमिस्ट उमाकांत आवटे , , गोडवाण किपर प्रमोद भोसले ई . डी . पी . मॅनेजर नवनाथ चव्हाण , केनयार्ड सुपरवायझर शंकर पाटील व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज