टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. त्यात प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली होती.
त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या होत्या. खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली होती. त्यावर राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
सुप्रिया सुळे यांनी बोलायचं नाही. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे, अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी केली आहे.
संपलेल्या पक्षावर मी काय काय बोलणार, अशी टीका करण्यात आली. येऊन बघा. हा विझलेला पक्ष नाही, हा समोरच्यांना विझवणारा पक्ष आहे, असं जोरदार प्रत्युत्तर राज ठाकरे यांनी दिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस हा निवडूण येणाऱ्या लोकांची मोळी आहे. त्याची रस्सी फक्त पवार साहेबांच्या हातात आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबळ यांच्यावर टीका केली. तुमचे सीए यांच्यामुळे तुम्हाला आत जावं लागलं. दोन अडीच वर्षे जेलमध्ये गेल्यावर पुन्हा यांचा शपथविधी झाला, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
मी याच्या अगोदरही बोललो होतो. सोक्षमोक्ष लावलेला बरा असतो. अजित पवारांना तीनचार महिने कु असा आवाज ऐकू येत होता. यावेळी राज ठाकरे यांनी काही व्हिडीओ ऐकूण दाखवले आहेत.
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यावरून पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. लाऊड स्पीकर कशाला लावता आहात?, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
लॉकडाऊन लावण्याच्या अगोदर मी बोललो होतो. मशिदीवरील भोंगे बंद झाले पाहिजेत. धर्म आपल्या घरामध्ये ठेवावा. मी याच्या आधीही बोललो. ऐकू नाही आलं. गुढीपाडव्याचा भोंगा ऐकू आला, असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे.
मशिदीवरील भोंग्यांच्या संपुर्ण देशाला त्रास होत आहे. याच्यामध्ये धार्मिक विषय कुठे आहे?, तुम्हाला जी प्रार्थना करायची आहे ती आम्हाला का ऐकवत आहात? असा सवाल त्यांनी केला.
तुम्ही आम्हाला विनाकारण त्रास देता. तुम्हाला सांगून कळत नसेल तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
नरेंद्र मोदी यांनी देशात आता सामान नागरी कायदा आणावा : राज ठाकरे
नरेंद्र मोदी यांनी देशात आता सामान नागरी कायदा आणावा अशी मागणी राज ठाकरे यांनी ठाणे येथील सभेत दिली. याचबरोबर देशातील लोकसंख्या नियंत्रण आणणारा कायदा करा अशी मागणी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.गुढी पाडव्याच्या सभेनंतर अनेकांनी जे अकलेचे तारे तोडले त्यांना उत्तर देण्यासाठी मी सभा घेतली आहे असं राज ठाकरे म्हणाले.
ईडीने नोटीस दिली म्हणून ट्रॅक बदलला हा गैरसमज. मला कोणतीही नोटीस येवो, अशा नोटिसींनी मी भीक घालत नाही.
यावेळी त्यांनी माझ्या ताफ्याला काही जण अडवणार आहेत हे गुप्तचर विभागाला समजलं, पण पवारांच्या घरावर एसटी कर्मचारी आंदोलन करणार आहेत हे समजलं नाही असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला आहे. आजची ही सभा मोठे स्क्रीन लावून अनेक राज्यांमध्ये दाखवली जात आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेचे राज्याच्या राजकारणावर उमटलेले पडसाद अजूनही विरलेले नाहीत. त्याच पार्श्वभूमीवर अवघ्या दहा दिवसांत राज ठाकरे यांची ठाण्यात आज दुसरी सभा होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज