टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहराच्या व तालुक्याच्या विकासात व वैभवात नारायणा एक्वा स्विम यांनी सुरू केलेल्या स्विमिंग पूल मुळे भर पडली असल्याचे गौरवोद्गार आमदार समाधान आवताडे यांनी काढले आहेत.
नारायणा एक्वा स्विम या स्विमिंग पूलचे उद्घाटन आमदार समाधान आवताडे यांचे हस्ते संपन्न झाले याप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा.शिवाजीराव काळुंगे, उद्योजक वैभव नागणे, उबाठा शिवसेनेचे उपनेते शरद कोळी, जकाराया शुगरचे सचिन जाधव, पक्षनेते नेते अजित जगताप, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सुयश जाधव, शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ.सुभाष कदम आदीजन उपस्थित होते.
आमदार आवताडे पुढे बोलताना म्हणाले की, महादेव भगत व भगत परिवार यांनी अहोरात्र प्रयत्न करून स्विमिंग पूल खेळाडूंसाठी खुले केले आहे.
आम्ही लहान असताना स्विमिंग पूल असावा असे प्रयत्न स्व.बी.टी पाटील सर व येताळा भगत सर यांनी केले होते ते स्वप्न आता खरे होताना दिसत आहे.
मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक खेळाडूंना भगत सर यांनी पोहण्यास शिकवले आहे. जसे ज्वारीचे कोठार म्हणून मंगळवेढा प्रसिद्ध आहे तसेच खेळाडूंचे कोठार म्हणून आता मंगळवेढा प्रसिद्ध होत आहे.
येथून पुढे सराव करणाऱ्या खेळाडूंना सोपे झाले आहे. येथे सराव करणाऱ्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.
महादेव विहीरीसाठी भरगच्च असा निधी उपलब्ध करून दिला आहे. येत्या काही महिन्यात पूर्वी प्रमाणे स्वच्छ सुंदर असे सुशोभीकरण होणार आहे.
तसेच मंगळवेढा शहरात येणाऱ्या काळात तरुणांसाठी अद्यावत चांगल्या पद्धतीची जिम, व्यायाम शाळा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक पर बोलताना प्रा.येताळा भगत म्हणाले की, मंगळवेढा शहरात आजपर्यंत कोणीच स्विमिंग पूल तयार केला नाही त्यामुळे अनेक तरुण मुले पोहणे शिकण्यापासून वंचित राहिले आहेत. 1990 च्या काळापासून किल्ला भागातील महादेव विहिरीत जास्तीत जास्त मुलांना आम्ही पोहण्यास शिकवले असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी शिंदे यांनी केले तर आभार नारायणा स्विमिंग पूलचे संचालक महादेव भगत यांनी मानले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज