टीम मंगळवेढा टाइम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर-शिरशी रस्त्यावर असणाऱ्या झारेवाडी येथे दादासाहेब गंगथडे यांच्या घरात हॉटेलचे साहित्य बनवत असताना गॅसचा स्फोट होऊन गंगथडे परिवारातील चार जण जखमी झाले होते.
यामध्ये श्रेया राहुल गंगथडे आणि स्वरा राहुल गंगथडे या दोन चिमुरड्यांचा गॅसचा स्फोट झाल्यानंतर जागेवरच मृत्यू झाला होता. यातील जखमी दोन मुलींची चुलती मोनाली दादासाहेब गंगथडे (२४) यांचा दोन महिन्यांच्या उपचारानंतर मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे, नंदेश्वर येथील झारेवाडी येथे राहत असलेल्या गंगथडे परिवाराचा मंगळवेढा तालुक्यातीलच शिरसी येथे हॉटेलचा व्यवसाय होता. हॉटेलचे साहित्य ते घरी नेहमीच बनवत होते.
२५ जून रोजी हॉटेलचे साहित्य बनवत असताना गॅस शेगडीची पाईप फुटून जोराचा स्फोट झाला आणि या स्फोटात गंगथडे परिवारातील चार जण गंभीर जखमी झाले.
यामध्ये श्रेया आणि स्वरा या दोन मुली जागीच मृत्युमुखी पडल्या होत्या. तसेच या दोन मुलींचे चुलते दादासाहेब गंगथडे व चुलती मोनाली गंगथडे यांच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.
पण दोघेही गंभीर जखमी असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना लातूर येथील लहाने हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत जवळपास दोन महिने लहाने हॉस्पिटलमध्ये दोघे पती-पत्नीवर उपचार सुरू होता.
त्यामध्ये शुक्रवार, २२ रोजी पत्नी मोनाली हिची मृत्यू सोबतची झुंज संपून तिचा मृत्यू झाला आहे. पती दादासाहेब याच्यावर लहाने हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज