टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ येथे ऊस तोड कामगाराला भर दुपारी ऊन्हाचा चटका लागून चक्कर आल्याने तो मृत पावल्याची धक्कादायक घटना घडली असून
मृतव्यर्तीचे नाव दशरथ संपत गायकवाड (वय 55 रा.इच्छा देवी चाळीसगाव जि.जळगाव) आस आहे. या घटनेची अकस्मात मयत अशी पोलिसात नोंद झाली आहे.
पोलीस सुत्रानी दिलेली माहिती अशी जळगाव जिल्ह्यातील ऊस तोड कामगार खाेमनाळ येथील शिवाजी खांडेकर यांच्या शेतात दि.६ मार्च राेजी सकाळी सात वाजता ऊस तोड करण्यासाठी आले होते.
दुपारी १२.३० तीस वाजता अचानक दशरथ गायकवाड यांना चक्कर आल्याने पत्नीस चक्कर येत असल्याचे सांगून झाडाखाली जाऊन झोपले.
कामगारांनी तोडलेला ऊस वाहनात भरून दिल्यानंतर पत्नी पतीस झाडाखाली जाऊन ऊठवत असता ते उठले नाहीत.
तोंडाला फेस आल्याचे निदर्शनास
यावेळी त्याच्या तोंडाला फेस आल्याचे निदर्शनास आले ट्रॅक्टर चालक जितेंद्र बाबा व सुनील मोरे या दोघांनी मोटरसायकलवर उपचारासाठी त्यांना मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासून मयत झाल्याचे घोषित केले.
याची खबर पत्नी पूजा बाई दशरथ गायकवाड यांनी दिल्यानंतर पोलिसात आकस्मात मयत आशि नोंद झाली आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज