मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । चारित्र्यावर संशय घेवून झोपेत असलेल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्या प्रकरणी पती औदप्पा उर्फ औदसिध्द काशिराया मलकारी (रा.सिध्दापूर ता.मंगळवेढा) याचेविरूध्द मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करून मंगळवेढा येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीश आर.व्ही नडगदल्ली यांनी त्यास ३१ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,यातील फिर्यादी आण्णाराया साहेब गुंड (रा.मदभावी.जि.विजापूर) यांची मुलगी श्रीदेवी ही १४ मार्च रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जिन्यावरून पडली असून उपचारासाठी तीला सोलापूर येथील अश्विनी हॉस्पीटलमध्ये नेण्यात आल्याचे नात जकूबाई हिने फोन करून सांगितले.फिर्यादीने सदर ठिकाणी जावून पाहिले असता श्रीदेवी हिच्यावर उपचार चालू होते.व ती बेशुध्द असल्याने फिर्यादी दवाखान्यास येवून जावून करत होता.
दि.१९ मार्च रोजी तीची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांनी तीला घेवून जाण्यासाठी सांगितल्याने जावई औदप्पा याने तीला सिध्दापूर येथे नेले त्यामुळे फिर्यादी गावी गेला असता दि.२० मार्च रोजी पहाटे ५ वा. ती मयत झाल्याचे आरोपीने फोनवरून कळविले.त्यावेळी फिर्यादीची पत्नी, भाऊ,मुलगा,चुलत भाऊ व भावकीतील लोक मयतीसाठी सिध्दापूर येथे आले. व दहन करून परत गेले.
दि.२४ मार्च रोजी फिर्यादीचा भाचा दत्तात्रय सिध्दाराम चौगुले याने जावई औदप्पा हा तीचे चारित्र्यावर संशय घेवून नेहमी तीला मारहाण करीत होता.व ती रात्री झोपली असताना तीचा गळा दाबल्याने उपचारासाठी तीला सोलापूर येथे दाखल केले होते.औदप्पा याने गळा दाबल्याने ती मयत झाल्याचे सांगितले.
औदप्पा याने जीन्यावरून पडून जखमी झाल्याचे सांगितल्याने फिर्यादीने त्यात लक्ष घातले नव्हते. मात्र भाच्याने सांगितल्यामुळे औदप्पा याने श्रीदेवीचा खून करून कोणालाही न सांगता खरी परिस्थिती लपवून ठेवून पोलिसांना न सांगता अंत्यविधी केल्याने फिर्यादीने मंगळवेढा पोलिसांत औदप्पा विरूध्द फिर्याद दिली.
पोलिसांनी आरोपीविरूध्द भा.दं.वि.सं कलम ३०२, १०२ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून आरोपीस न्यायालयात उभे केले असता न्यायाधीशांनी ३१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याचा अधिक तपास पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज