मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । लॉकडाऊनच्या काळात हत्याकांडानं सोलापूर शहर हादरलं आहे. एका हॉटेलच्या मॅनेजरचा खून झाल्याची घटना उघड झाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास भला मोठा दगड डोक्यात घालून हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
तळे हिप्परगा येथील हॉटेल सौरभचे व्यवस्थापक कैलास आप्पाराव परबळकर (रा. शाहीर वस्ती, भवानी पेठ) यांचा खून करुन आरोपी वस्ताद आकाश मंडल (रा. पश्चिम बंगाल) पसार झाला आहे. पोलिसांनी आकाशविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 11) मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सोलापूर- तुळजापूर रोडवरील हॉटेल सौरभमध्ये कैलास परबळकर हे सात वर्षांपासून व्यवस्थापक म्हणून काम करीत होते. 23 मार्चपासून राज्यात लॉकडाउन असल्याने हॉटेल बंद ठेवण्यात आले होते. वस्ताद आकाश हा त्याच ठिकाणी राहण्यास होता. दरम्यान, 13 जूनपासून हॉटेल व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात आली.
मात्र, हॉटेलमधील जेवण विभाग बंदच ठेवून पार्सल दारुची सोय त्याठिकाणी करण्यात आली होती. त्यामुळे परबळकर हे त्याच ठिकाणी मुक्कामी असायचे. शनिवारी वस्ताद आकाश आणि परबळकर जेवण करुन हॉटेलमध्ये झोपले. रविवारी (ता. 12) सकाळी सफाई करण्यासाठी कामगार आला असता त्याला दोघेही त्याठिकाणी दिसले नाहीत. त्यावेळी त्यांनी हॉटेल मालक राजू गुल्लापल्ली यांना फोनवरुन माहिती दिली.
मालक गुल्लापल्ली यांनी तत्काळ हॉटेल गाठले आणि आजूबाजूला पाहणी केली. त्यावेळी परबळकर यांचा खून करुन त्यांचे प्रेत हॉटेलच्या मागे टाकण्यात आल्याचे दिसले. या घटनेची माहिती त्यांनी तालुका पोलिस ठाण्यास कळविली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी घटनेची चौकशी सुरु केली आहे.
Murder of Solapur hotel manager by Vastad; Put a big stone in your head
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज