मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मेटकरवाडी येथील कॉलेज युवक सागर सुभाष वाघमोडे (वय 19) याचा अज्ञात कारणावरू लाथा बुक्क्याने मारहाण करून खून करण्यात आला. हि घटना शनिवारी रात्री 7.15 वाजता खडकी येथे घडली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पाटखळ व खडकी परिसरात रवाना झाले आहे. दरम्यान रात्री उशीरा वृत्त देईपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
या घटनेची हकिकत अशी, यातील मयत सागर वाघमोडे हा मंगळवेढ्यातील श्री संत दामाजी महाविद्यालयातील विद्यार्थी असून कॉलेज सुटल्यानतंर तो आपल्या गावी गेला होता. दि.1 फेब्रुवारी रोजी रात्री 7.15 वाजता काही कामानिमित्त तो खडकी येथे गेला होता. यावेळी अज्ञात कारणासाठी बंडू मेटकरी व मयत सागर वाघमोडे शाब्दीक बाचाबाची झाल्याने चिडलेल्याआरोपीबंडूने लाथा बुक्क्याने जबर मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला.
घरातील नातेवाईकांनी अधिक उपचारासाठी मंगळवेढा ग्रामीण रूग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच तो मयत झाला.
पो.नि.ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक आरोपीच्या शोधासाठी तात्काळ पाटखळ खडकी परिसरात गेले आहे. दरम्यान वाघमोडे कुटुंबियामध्ये मयत सागर हा एकाटाच महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. त्याचे आई वडील ऊस तोडणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात गेले आहेत. मयत हा त्याच्या आजी जवळ राहत होता. तरूणाची हत्या झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान मयत सागर वाघमोडे याचे आई-वडील हे कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणी करण्यासाठी गेले आहेत.सागर हा आज्जी जवळ राहत होता.त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज