mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अ‍ॅट्रोसिटीसह खूनाचा गुन्हा दाखल ; आंतरजातीय प्रेमप्रकरणातून 20 वर्षीय तरुणाची हत्या

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
अ‍ॅट्रोसिटीसह खूनाचा गुन्हा दाखल ; आंतरजातीय प्रेमप्रकरणातून 20 वर्षीय तरुणाची हत्या

टीम मंगळवेढा टाईम्स । आंतरजातीय प्रेमप्रकरणातून चार ते पाच जणांनी 20 वर्षीय तरुणाचा धारदार हत्याराने वार करून खून केला. ही घटना पिंपळे सौदागर येथे रविवारी (7 जून) रात्री ही घटना घडली. विराज विलास जगताप (वय 20, रा. तक्षशिलानगर, पिंपळे सौदागर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

प्रेमप्रकरणातून एका युवकाचा लोखंडी रॉड आणि दगडांनी जबर मारहाण करुन खून करण्यात आला आहे. मुलीचे वडील, चुलते तसेच सख्ख्या आणि चुलत भावांनी मिळून प्रियकराचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले असून यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

विराज विलास जगताप (वय 20) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जितेश वसंत जगताप (वय 44) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दहाच्या सुमारास संशयित आरोपींनी जितेश जगताप यांना फोन करुन विराजला पिंपळे सौदागर येथे मारले आहे. त्याला येथून घेऊन जा असे फोनद्वारे सांगितले.

जितेश हे मृत विराजच्या आईसह घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी विराज हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. विराजने जितेश यांना सर्व हकिकत सांगितली. मुलीचे वडील, भाऊ यांनी टेम्पोने आपल्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली.

नंतर त्यांच्या हातातील दगड आणि लोखंडी रॉड पाहून घाबरून पळू लागल्याचे विराजने जितेश यांना सांगितले. धाप लागल्याने खाली पडल्यानंतर आरोपींनी लोखंडी रॉड आणि दगडाने आपल्याला मारहाण केली. माझ्या मुलीवर प्रेम करायची लायकी आहे का तुझी, असे म्हणून आपल्या अंगावर थुंकल्याचे विराजने जितेश यांना सांगितले. दरम्यान, जखमी विराजला खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

परंतु, सोमवारी दुपारी उपचारादरम्यान विराजचा मृत्यू झाला. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात खून, अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश माने हे तपास करत आहेत.

Murder of 20-year-old youth over interracial love affair;  Murder case with atrocity Pune

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeMaharashtra MazaRecent News

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
धक्कादायक : कार्टून बघण्यास विरोध केला ; मुलानं गमावला जीव

धक्कादायक : कार्टून बघण्यास विरोध केला ; मुलानं गमावला जीव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा