टीम मंगळवेढा टाईम्स ।
सांगली शिक्षण संस्था, सांगली आयोजित केलेल्या सांगली गुणवत्ता शोध परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत नगरपालिका कन्या शाळा क्रं. १, मंगळवेढा या शाळेचे इयत्ता दुसरीचे ९ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत.
सांगली शिक्षण संस्था, सांगली आयोजित करण्यात आलेली ही परीक्षा नगरपालिकेच्या मुलांची शाळा क्रं. १ मध्ये २४ एप्रिल २०२२ घेण्यात आली होती.
सदर परीक्षेसाठी संपूर्ण राज्यभरातून हजारो विद्यार्थी बसले होते. १५० गुणांच्या या परीक्षेत कन्या शाळा क्रं.१ च्या शुभ्रा सुभाष देशमुख हिने संपूर्ण राज्यातून एकटीनेच १५० पैकी १५० गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.
तसेच गुणवत्ता यादीत आलेल्या प्रचिती नंदकुमार जाधव १४० गुण, राजवीर सतीश दत्तू १३८ गुण, वेदांत विनायक नेहरवे १३४ गुण, जान्हवी गणपत लेंडवे १३० गुण,
समर नितीन पलुसकर १२४ गुण, अनुप मल्लेशा अरकेरी १२४ गुण, आर्यन नितीन गोवे १२० गुण, समर्थ सत्याप्पा जामगुंड १२० गुण मिळवून या विद्यार्थ्यांनी राज्यभर न.पा.कन्या शाळा क्रं.१ चा व मंगळवेढा नगरपालिकेचा गुणगौरव होत आहे.
या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक मारुती दवले गुरुजी यांनी कोविड-१९ कालावधीत जवळपास दीड वर्ष शाळा बंद असताना सुद्धा ऑनलाईन तास चालू ठेवले होते.
या वर्गातील विद्यार्थी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला आणि शाळा बंद झाल्या. पहिली म्हणजे विद्यार्थ्यांचा पाया; अशा परिस्थितीत मुलांचे शिक्षण बंद पडू नये व मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून दवले गुरुजींनी दररोज ऑनलाईन तास घेऊन या विद्यार्थ्यांना घडवले.
याचेच फळ म्हणून हे विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. तसेच यासाठी पालकांनीही खूप चांगल्याप्रकारे साथ दिली.
विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचा जर संयोग झाला तर अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात हे नगरपालिका कन्या शाळा क्रं.१ च्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे.
वरील सर्व विद्यार्थ्यांना मारुती दवले गुरुजींबरोबर मुख्याध्यापक अरविंद क्षीरसागर गुरुजी, सहशिक्षक व सोलापूर जिल्हा पतसंस्थेचे माजी चेअरमन संजय चेळेकर गुरुजी व मारुती वाकडे गुरुजी यांनी मार्गदर्शन केले.
गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व पालक यांचे प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव, प्रशासनाधिकारी शाहू सतपाल,
केंद्र समन्वयक सुनील शिंदे गुरुजी, मार्गदर्शक मुख्याध्यापक राजकुमार मांजरे गुरुजी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.प्राजक्ता ताड, उपाध्यक्ष बापूसाहेब यादव,
सर्व सदस्य, मंगळवेढा शिक्षण मंडळाचे हेड अकाऊंटंट आनंद हिरेमठ व सर्व पालकांनी यांनी प्रत्यक्ष भेटून, फोन करून व मेसेज करून अभिनंदन केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज