मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
दिंडोरी येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्याच काल अनावरण करण्यात आलं. यावेळी आयोजित समारंभात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या खासदार सुप्रिया सुळे मटण खाण्याच्या वादावर भाष्य केलं आहे, तसेच महायुती सरकारवरही टीका केली आहे.
मी मटण खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं असं सुळे यांनी म्हटलं आहे, यामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मटण खाल्लं तर पांडुरंगाला चालतं – सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे यांना या समारंभात बोलताना मटण खाण्याबाबत बोलताना म्हटले की, ‘मी रामकृष्ण हरीवाली आहे. फक्त माळ घालत नाही, कारण कधी कधी मटण खाते. मी त्यांच्या सारखी खोटं बोलत नाही. खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे?
माझे आई वडील, सासू सासरे, नवरा खातो, आमच्या पैशाने खातो आपण कोणाला मिंदे नाही, जे आहे डंके की चोट पर आहे, दिलं खोल कर चलो. खाते तर खाते खाल्लं तर काय पाप केलं काय? असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, ‘मी नॉनव्हेज खाते, फक्त माळ घालत नाही, त्यामुळे अजून मोह होतो. ज्या दिवशी माळ घालेल त्या दिवशी मटण खाणं सोडून दिलं असे समजा.’ सुप्रिया सुळे यांच्या या विधानामुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
अन्यायाविरोधात झुकणार नाही
सुप्रिया सुळे यांनी पुढे बोलताना सत्ताधाऱ्यांवरही टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, ‘प्रॉब्लेम असा आहे, तुम्ही आम्हाला पक्ष समजत नाही, माझ्या आईचेही गुण माझ्या अंगात त्यामुळे कितीही कष्ट करावे लागले तरी मी सत्याची बाजू कधी सोडणार नाही, अन्यायाविरोधात झुकणार नाही.
माझी ताकद माझी इमानदारी आहे. माझी विकासाची आयडिया आणि सरकारची विकासाची आयडिया यात फरक आहे. इथे बसलेल्या महिलेची काचेही बांगडी सोन्याची होईल त्याला विकास म्हणतात. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळेल तेव्हा विकास म्हणतात असं सुळे यांनी म्हटलं आहे.
याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देतील : फडणवीस
दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘याच उत्तर मी देणार नाही याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देतील.’
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज