टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील लॉकडाउन रद्द करावा, या मागणीसाठी आज चक्क पोटनिवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवार शैला गोडसे यांनी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले.
कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याच्या धास्तीने राज्य सरकारने मिनी लॉकडाउन जाहीर केला आहे. पंढरपुरातील विठ्ठल – रुक्मिणी मंदिरासह राज्यातील सर्वच देवस्थाने बंद केली आहेत.
पंढरपूरची अर्थव्यवस्था ही वारीवर अवलंबून आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षभरात पंढरपूरच्या चार प्रमुख यात्रा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे येथील छोट्या – मोठ्या व्यावसायिकांवर आर्थिक अडचणी आल्या आहेत. असे असतानाच राज्यात पुन्हा लॉकडाउनचे संकट घोंगावू लागले आहे.
सध्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये शहरातील लॉकडाउनचा मुद्दा येथील प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला आहे. दोन दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांनी आम्हाला दुकाने उघडण्यास परवानगी द्या, या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते.
त्याच मागणीनुसार पंढरपूर – मंगळवेढा विधानसभेचे अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांनी आज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. पोटनिवडणुकीसाठी मोठ्या राजकीय पक्षांच्या सभांना प्रचंड गर्दी होत आहे.
यावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन होताना दिसत असताना फक्त व्यापाऱ्यांवर निर्बंध लादले जात असल्याचा आरोप करत सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज