टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा सबजेल मधून आरोपीस जामीन मिळाल्यानंतर त्या आरोपीस अक्कलकोटच्या गुन्ह्यात पोलीस घेवून जात असताना
आरोपीच्या आईने माझ्या मुलास घेवून जाऊ नका असे म्हणून जमीनीवर डोके आपटून, स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून काडी पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी
आरोपीची आई सुरेखा भारत पवार (वय 60 वर्षे) या महिलेविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान उपस्थित महिला पोलीस नाईक सुनिता चवरे व पाेलीस शिपाई वंदना आटपाडकर यांनी तात्काळ ताब्यात घेतल्याने त्या वृध्द महिलेचा बालंबाल …जीव बचावला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील आरोपी अर्जुन भारत पवार (रा.कवे ता.माढा) यास भा.दं.वि.कलम 379 मधील गुन्हयात मंगळवेढा सबजेल मध्ये न्यायालयीन कोठडीत ठेवले होते.
दि.10 रोजी मंगळवेढा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी त्यास जामीन मंजूर केला होता. आरोपीस सबजेलच्या बाहेर मंगळवेढा उपविभागीय कार्यालयासमोर आणल्यानंतर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याकडील
गुन्हा रजिस्टर नं.280/2021 भा.दं.वि.कलम 379 मध्ये पोलीस हवालदार महादेव चिंचोळकर, पोलीस शिपाई प्रमोद शिंपाळे,पोलीस शिपाई अंकुश राठोड, नामदेव माने हे सर्व पोलीस कर्मचारी आरोपीस ताब्यात घेत असताना
आरोपीचे आई सुरेखा भारत पवार हिने गोंधळ घालत हा माझा मुलगा आहे, माझ्या मुलास घेऊन जाऊ नका असे म्हणून तिने स्वत: जमीनीवर डोके आपटून अंगावर पेट्रोल ओतून काडी पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असताना
महिला पोलीस नाईक सुनिता चवरे व महिला पोलीस वंदना आटपाडकर यांनी जागरुकपणे तिला ताब्यात घेतल्याने तिचा जीव वाचला असून तिला मंगळवेढा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून याची फिर्याद गोपनीय विभागाचे पोलीस हवालदार दिगंबर गेजगे यांनी दिली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज