mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बापरे…! सहा कोटींचा वाळूचा ठेका 21 कोटींला गेला; मंगळवेढ्यातील बांधकामांना मिळणार मुबलक वाळू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 16, 2022
in मंगळवेढा, सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील वाळू लिलावास अखेर मिळाला मुहूर्त; ‘या’ दिवसापासून ऑनलाइन प्रक्रिया

टीम मंगळवेढा टाईम्स ।

तीन वर्षांनंतर अखेर सोलापूर जिल्ह्यातील वाळू लिलावा मुहूर्त मिळाला आहे. ९ पैकी ४ ठिकाणांवरील ६२ हजार ९२२ ब्रास वाळू लिलावातून महसूल प्रशासनाला ६९ कोटी ३३ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.

११ हजार रुपये ब्रासने वाळू लिलाव

ठेकेदाराने सरासरी ११ हजार रुपये ब्रासने वाळू लिलाव घेतले आहेत. पाच ठिकाणी एकाही ठेकेदाराने बोली लावली नाही. या लिलाव प्रक्रियेमुळे आता शहर जिल्ह्यातील बांधकामांस मुबलक वाळू उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

विशेष म्हणजे नवीन वाळू उपसा धोरणानुसार तीन वर्षांसाठी हे ठेके देण्यात आले आहेत. दर वर्षानंतर ६ टक्के अधिक महसूल देऊन वाळू उपसा करण्यात येणार आहे.

मोहोळ तालुक्यातील अर्धनारी येथील १५७८० ब्रासचा साठा ११ कोटी ९० लाखांस गेला. त्याची शासकीय किंमत ६.९० कोटी होती.

मोहोळ तालुक्यातील अर्धनारी-बठाण मंगळवेढा साठा क्रमांक १ येथील ठेका १५ हजार ८४८ ब्रासचा होता. तो २१.३३ कोटी रुपयास गेला आहे. त्याची शासकीय किंमत ६.९ कोटी होती.

अर्धनारी-बठाण साठा क्रमांक २ येथील ठेका १५ हजार ७६८ ब्रासचा होता, तो २१ कोटी ३० लाख रुपयास गेला, त्याची शासकीय किंमत ६.९ ० कोटी होती.

अर्धनारी बठाण साठा क्रमांक ३ हा १५ हजार ५२६ ब्रासचा होता, तो १४ कोटी ८० लाख रुपयास गेला. त्याची शासकीय किंमत ६.८० कोटी होती.(स्रोत; दिव्य मराठी)

प्रतीक्षा संपली, बांधकामांना वेग

जिल्ह्यात राष्ट्रीय हरित लवाद, उच्च न्यायालय, कोरोना व इतर कारणांमुळे लिलाव होऊ शकले नाहीत. यंदाही ९ पैकी फक्त ४ ठिकाणी ठेकेदारांचा प्रतिसाद मिळाला.

घोडेश्वर तामदरडी येथील साठा क्रमांक १ ते ३ , मिरी तांडोर , मिरी सिद्धापूर या पाच ठिकाणी एकाही ठेकेदारांनी बोली लावली नाही.

चार ठिकाणचे लिलाव झाल्याने आता पुढील तीन वर्षे जिल्ह्यातील शासकीय कामांसोबतच बांधकामांना मोठ्या प्रमाणात वाळू उपलब्ध होणार आहे.

दोन ठेक्यांना तिप्पट रक्कम

तीन वर्षांनंतर वाळू लिलाव झाल्याने ठेक्यासाठी स्पर्धा वाढली आहे. दोन ठेक्यासाठी शासकीय किमतीच्या दुप्पट तर तीन ठेक्यासाठी तिप्पट रक्कम मिळाली.

अर्धनारी- बठाण येथील साठा क्रमांक एकला सर्वाधिक किंमत मिळाली. ६.९ ३ कोटी किंमत असताना २१.३३ कोटी रुपये मिळाले. त्याखालोखाल साठा क्रमांक २ साठी ६.९ ० कोटी किंमत असताना २१.३० कोटी रुपये मिळाले आहेत.

इतर दोन्ही ठिकाणी दुप्पट रक्कम मिळाली आहे. लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली असून, सोमवारनंतर पैसे भरून घेणे व ताबा देण्याची प्रक्रिया होईल असे अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव म्हणाले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: वाळू लिलाव

संबंधित बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

साप चावला तर जबाबदार कोण? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेतील धोकादायक इमारतीच्या अवशेषांवरून पालकांचा प्रशासनाला थेट सवाल

August 30, 2026
धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

August 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ४ तालुक्यांत उभारणार १२ कृषी अवजार बँका; संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित

August 29, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
Next Post
पालकांनो मुलांचे भविष्य घडवा! मंगळवेढ्यात उद्या नवजात बालकांपासून ते १६ वर्षा पर्यंतच्या बालकांसाठी सुवर्णप्राशन शिबीर; फायदे वाचून थक्क व्हाल

आपल्या मुलांसाठी आयुर्वेदाचे वरदान सुवर्णप्राशन संस्कार! मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून मुलांना सुदृढ निरोगी व बुद्धिमान बनविण्याचा आयुर्वेदिक उपाय...

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..