टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील एका गावात शौचास जावून परत घराकडे येणार्या 17 वर्षीय मुलीचा रस्त्यामध्ये अडवून विनयभंग केल्याप्रकरणी आकाश गोरख भोसले,महादेव खंडू भोसले,किरण खंडू भोसले (सर्व रा.हुन्नूर) या तीघाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील पिडीत अल्पवयीन मुलगी व तीची आजी दि.13 रोजी रात्री 9.30 वा.घरात शौचालय नसल्याने बाहेर सरकारी दवाखान्याच्या बाजूला शौचास जावून परत घराकडे येत असताना
वरील तीघा आरोपीनी पिडीतेस रस्त्यात अडवून आकाश भोसले याने पिडीतेचा उजवा हात धरला व तीला तू फार छान दिसतेस,
तु मला खूप आवडतेस असे म्हणाला.तसेच महादेव भोसले याने तीचा डावा हात धरला.व किरण भोसले याने तीची ओढणी ओढून मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
यावेळी हा प्रकार घडत असताना मदतीला निर्भयाची आजी गेली असता तीला धक्का बुक्की करण्यात आली.
पिडीतेने आरडा ओरडा केल्यानंतर तीघे आरोपी घाबरून पळून गेले. सदर घटनेचा जाब विचारण्यासाठी पिडीतेच्या कुटुंबातील सदस्य घरी गेले असता वरील आरोपीने त्यांना शिवीगाळ,दमदाटी केल्याचे म्हटले आहे
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज