मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । प्रेमप्रकरणाच्या नैराश्यातून मोहोळ शहरातील २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. ८ मार्च रोजी पाच वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली.याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश उमेश गोटे राहणार चाटी गल्ली मोहोळ याचे शहरातील एका तरुणीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते.
त्यातुनच आलेल्या नैराश्य पोटी क्र एम एच १३ बी एम . ००४१ या दचाकीवरून तो सौंदणेकट जवळील सय्यद विरवडे हददीतील वनखात्याचे जंगलात गेला तेथे झाडास दोरीने गळफास घेतल्याने त्याचा मृत्यु झाला. त्याचे प्रेमप्रकरण असल्याचे तो नाराज होता.त्यांने नैराश्य पोटीच गळफास घेतला असल्याची खबर त्याचे वडील उमेश गोटे यांनी मोहोळ पोलिसात दिली असून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास मोहोळ पोलिस स्टेशनचे पोलिसनाईक लक्ष्मण राठोड करीत आहे.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज