टीम मंगळवेढा टाईम्स ।
केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना दिवाळीच्या निमित्ताने मोठी भेट दिल्याचं पाहायला मिळत आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी पासून केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील ड्युटी कमी करण्याचा निर्णय
घेतल्याने पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत महागाईतून दिलासा मिळाला आहे.
आजपासून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू होणार असून पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क कपात करत पेट्रोलच्या किमती 5 रुपयांनी तर डिझेलच्या किमती 10 रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत.
ऐन दिवाळीत कर कमी केल्याने भाजप नेत्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने सर्वोच्च उच्चांक गाठला होता.
त्यातच केंद्र सरकारने दिलेल्या दिवाळी गिफ्ट मुळे सर्वसामान्याची दिवाळी काही प्रमाणात दिलासादायक होईल, असं एकंदरीत बोललं जात आहे.
पेट्रोलच्या तुलनेत डिझेल वरील उत्पादन शुल्क हा दुपटीने कमी करण्यात आल्याने डिझेलच्या किमती प्रती लिटर तब्बल 10 रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत.
शेतीतील अनेक उपकरणे डिझेलवर चालतात त्यामुळे डिझेलच्या कमी झालेले दराचा शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि रब्बी हंगाम नुकताच सुरू होणार असून शेतकऱ्यांना या कपातीचा फायदा होणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज