मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
पंढरपुर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये परिचारक यांच्या विरोधात अभिजीत पाटील आणि मनसेचे २ उमेदवार आणि बळीराजा शेतकरी संघटनेचा १उमेदवार विरोधात उभे होते.
विरोधी गटात मत विभाजनी होऊ नये यासाठी मनसेच्या २ उमेदवारांनी अभिजीत पाटील यांच्या पॅनलला जाहीर पाठिंबा दिला असल्याचे मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी जाहीर केले. तसेच बळीराजा शेतकरी संघटनेचा उमेदवार अभिजीत पाटील यांच्या पॅनेलमध्ये सहभागी झाले आहेत.
इथून पुढे सर्व मनसे सैनिक विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्यासोबत कायम काम करणार असल्याचे मनसेचे दिलीप धोत्रे यांनी सांगितले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये अभिजीत पाटील यांनी स्वतंत्र पॅनल उभा केल्यामुळे सत्ताधारी परिचारक पॅनलला गावोगावी जाऊन प्रचार सभा घ्याव्या लागत आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समिती साठी अभिजीत पाटील यांच्या पॅनलने १२ उमेदवार उभे केले आहेत मनसेने दोन उमेदवार उभे केले होते मनसेच्या शशिकांत पाटील आणि
अनिल बाबर या दोघांनी अभिजीत पाटील यांच्या पॅनलला जाहीर पाठिंबा दिला आहे तसेच बळीराजा शेतकरी संघटनेचे श्री रमेश पवार हे अभिजीत पाटील यांच्या पॅनलमध्ये सहभागी झाले आहेत.
यावेळी मनसेचे नेते दिलीप धोत्रे, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, स्वेरीचे संस्थापक अध्यक्ष बीपी रोंगे सर, धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील,
मल्टीस्टेटचे चेअरमन महादेव तळेकर, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते माऊली जवळेकर,
विठ्ठलचे संचालक धनंजय काळे, आनंद पाटील, नंदकुमार बागल, मधुकर मोलाने, यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज