टीम मंगळवेढा टाईम्स ।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एका गुंडाला मला जिवे मारण्याची सुपारी दिली आहे, असा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. राऊतांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यावर विविध नेत्यांनीदेखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ही टीका करताना शहाजीबापू यांनी संजय राऊतांचे बारसेच केले आहे. संजय राऊत यांचं नाव बदलून संजय आगलावे असं करायला हवं, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली आहे.
फक्त संजय राऊत यांच्या विरोधातच शहाजीबापू का एवढं आक्रमक होतात, याबाबतची चर्चाआता जोर धरू लागली आहे.
सत्यजित तांबे यांना कोण कोण भेटणार?
काँग्रेसचे बंडखोर नेते आमदार सत्यजित तांबे शनिवारी सोलापुरात आहेत. एका खासगी कार्यक्रमात ते सहभागी होतील. तांबे हे युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील युवा नेते त्यांच्या संपर्कात होते.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या आमदार तांबे यांना आमदार तांबे यांनी काँग्रेस नेत्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. या भूमिकेला जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला होता.
पाठिंबा देणाया कारवाई झाली. जिल्हा काँग्रेसमध्ये शिंदे विरुद्ध मोहिते-पाटील असे गट आहेत. कोण कोणाला भेटते यावर दोन्ही गटांतील नेत्यांचे लक्ष असते.
या भेटीवरून कार्यकर्त्यांची राजकीय वाटचाल ठरते. सत्यजित तांबे यांच्याबद्दल काँग्रेसच्या हायकमांडने अजूनही भूमिका स्पष्ट केलेली नाही. या पार्श्वभूमीवर तांबे यांना कोण कोण, या भेटीचे काय परिणाम होणार, याची कुजबुज ऐकायला मिळाली.(स्रोत; लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज