टीम मंगळवेढा टाईम्स ।
अलीकडे आर्चीच्या सैराट चित्रपटाने धुमाकूळ घातला होता त्यानंतर काय झाडी, काय डोंगर, काय हाटील या माझ्या वाक्याने अमेरिके पर्यन्त धुमाकूळ घातला असल्याचे प्रतिपादन आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले आहे.
दलित मित्र कदम गुरूजी सायन्स महाविद्यालयात सुरू असलेल्या 18 व्या युवा महोत्सवाला आज त्यांनी हजेरी लावली याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
याप्रसंगी फॅबटेक उद्योग समूहाचे प्रमुख भाऊसाहेब रूपनर, अँड.सुजित कदम, तानाजी गुंड, डॉ.सुभाष कदम, विश्वास महाडिक, जकराया शुगर्सचे चेअरमन बी.बी जाधव, सौ.प्रियदर्शनी कदम-महाडिक आदीजन उपस्थित होते.
आ.पाटील पुढे बोलताना म्हणाले की, जीवन जगण्याचे खरे वय हे कॉलेज जीवनात असते या जीवनाचा संपूर्ण आनंद घेतला पाहिजे युवा महोत्सवाच्या सारख्या कलात्मक कार्यक्रमातून आपली संस्कृती जपली जाते.
आधुनिक तंत्रज्ञान काळात सांस्कृतिक कार्यक्रम लोप पावत चालले आहेत, हा सांस्कृतिक ठेवा जपायला हवा असे भावनिक आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले आहे.
जीवन हे धाडसाने जगले पाहिजे, जिवन यशस्वी होईल, तरच स्वतःची स्वप्ने पूर्ण होतील असा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये वाढवला.
आपल्या आई बद्दल नेहमीच आपल्या मनात आधार व प्रेम असले पाहिजे हेच जीवनातील खरे प्रेरित असल्याचे त्यांनी सांगितले.
सुजीत बापूंचे नियोजन ओकेमध्ये
काय ते सुजीत बापूंचे नियोजन, काय ते दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय, काय ते सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव सगळं ओके मध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज