टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील पाणीप्रश्न सोडवू हे जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी मी माझ्या राजकीय ताकदीचा परिपूर्ण वापर करणार असून त्यासाठी कोणताही अडथळा पार करण्याची तयारी आहे.
संपूर्ण मंगळवेढेकरांसाठी वरदान ठरेल अशा महत्त्वाकांक्षी २४ गाव उपसा सिंचन ( बंदिस्त पाईपलाईन द्वारे ) योजनेचा आढावा व अडथळे घेण्यासाठी आ.समाधान आवताडे यांनी मंगळवेढा येथे आढावा बैठक आयोजित केली होती.
या बैठकीनंतर ते बोलत होते. या योजनेतील संबंधित गावांना नवसंजीवनी देणाऱ्या या योजनेबाबत आ.आवताडे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
सर्व विभागनिहाय आढावा तसेच प्रशासकीय स्तरावरील प्रलंबित प्रस्तावांचाही आढावा घेऊन पुढील कार्यवाही संबंधी योग्य त्या सूचना दिल्या.
आ.आवताडे बोलताना म्हणाले की, गेली अनेक वर्षे प्रलंबित पाणीप्रश्न म्हणजे मंगळवेढा तालुक्याच्या विकासाला आणि प्रगतीला बसलेली खूप मोठी खीळ आहे.
त्यामुळे अशा प्रश्नांना कोणताही राजकीय रंग न देता तालुक्याच्या दीर्घकालीन विकासासाठी अशा प्रश्नांवर मी नेहमीच माझे योगदान देण्यास मी पुढे असेन , अशी ग्वाही त्यांनी या आढावा बैठकीत दिली
या बैठकीला अभियंता जोशी , मनोज पंडित , घोडके हे अधिकारी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज