टीम मंगळवेढा टाईम्स ।
साखर कारखानदारी शेतकऱ्यांची विकास गंगा म्हणून ओळखली जाते.ही कारखानदारी मोडकळीस आणण्यासाठी आ.समाधान आवताडे हे जबाबदार असल्याचा आरोप पक्षनेते अजित जगताप यांनी केला आहे.
ते श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ माचणूर येथील सिध्देश्वर मंदिरात फोडण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.
अजित जगताप पुढे बोलताना म्हणाले की , दामाजी कारखाना वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांचा हा राजवाडा आ.आवताडे यांनी प्रायव्हेट करण्याचा घाट घातला होता. परंतु आम्ही तो डाव हाणून पाडला आहे.
आवताडे यांनी या कारखान्यावरील जुने ऊस उत्पादक आहेत त्यांना कमी करून फक्त आपल्या मर्जीतले लोक या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला आहे.
या विरोधात आम्ही शरदचंद्रजी पवार व अजितदादा यांना भेटलो आणि सांगितलं कारखानदारी टिकली पाहिजे तेव्हा सर्व शेतकरी व सभासदांचा हा कारखाना अबाधित राहिला म्हणून आज 28 हजार सभासदांना न्याय मिळतोय.
ज्यांचे शेअर्स अपूर्ण आहेत अशा पंचवीस हजार सभासदांना काढून टाकण्याचे पाप आ.आवताडे यांनी केले आहे .त्यांच्या मर्जीतल्या लोकांचेच भले त्यांचे वय पाच-सहा वर्षे का असेना त्या मुलांचे शेअर्स हे नवीन घेतले असून अडीच हजार सभासद नवीन बनवले आहेत.
प्रा.शिवाजीराव काळुंगे म्हणाले की, श्री. संत दामाजी सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांचा राजवाडा आहे तो या तालुक्यातील सर्व सभासदांच्या मालकीचा आहे. त्यामुळे हे शेतकऱ्यांचे पॅनल आता निवडणुकीत सामोरे जात आहे.
आता मागे काय घडलं हे उघळत बसण्यापेक्षा येणाऱ्या काळात आपण नवीन इतिहास निर्माण करूया.
आज एक जुलै शेतकरी दिवस आहे. आपण आपल्या प्रचाराचा शुभारंभ चांगल्या मुहूर्तावर आयोजित केला आहे. त्यामुळे येत्या 12 तारखेला विमान या चिन्हावरील शिक्का मारून या सर्व उमेदवारांना आपण विजयी करावं.
या आपल्या प्रचारात कोणी जास्त फिरायची गरज नाही. प्रत्येकाने आपला गाव व विभाग सांभाळा आपल्या पॅनलला जास्त मताधिक्य कसे मिळेल हे पहा. प्रत्येकाने आपापली जबाबदारी उचला. मग पहा आपला विजय निश्चित आहे.
कारण तालुक्याच्या हितासाठी हे आपल्याला करावंच लागेल. निवडणुकीमध्ये ‘जो जीता वही सिकंदर’ असतो मग तो एक मतानं असो किंवा हजार मतान असो शेवटी निवडून येणं महत्त्वाचं असतं.त्यामुळे आपण प्रामाणिकपणे काम करून आपल्या सर्व उमेदवारांना विजयी करावं.
25 वर्षांपूर्वी 300 रुपये फी भरून आपण हा राजवाडा उभा केलेला आहे. तो शेतकऱ्यांच्याच मालकीचा राहिला पाहिजे यासाठी थोडं जागरूक राहा व योग्य माणसाच्या हाती याची सूत्रे द्या.
जेव्हा आमचे मंडळ सत्तेवर आले तेव्हा 64 लाखाचे समान चार हफ्ते पाडले व माझ्या काळात एकदम दोन हप्ते मी भरले होते. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा ब्रम्हपुरी शाखेचे अडीच कोटी रुपये कर्ज होतं.
आधीपासूनच 1 कोटी 28 लाख असलेले कर्ज मी एक रकमेने भरले होते. हे सर्व झाल्यानंतर फक्त 66 लाख कर्ज राहिले होते.आम्ही नुसते कर्ज घेतले नाहीत तर त्यावेळी दुष्काळी परिस्थिती होती.
परंतु कामगारांचा महिन्याला पगार व्हायचा, फरक दिला जायचा, बक्षीस दिलं जायचं कामगारांचे काहीच आम्ही पाठीमागे ठेवले नाही. एक वेळ तर शेतकऱ्यांच्या भावाला इतर कारखान्यापेक्षा पन्नास रुपये जास्त दर दिला.
तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवून सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा या दामाजी कारखान्याच्या इतिहास पहिल्यांदा केला होता असेही काळुंगे यांनी शेवटी सांगितले.
रतनचंद शहा सहकारी बॅंकचे चेअरमन राहूल शहा बोलताना म्हणाले की, हा शेतकऱ्यांचा राजवाडा उभा करण्यासाठी कै.रतिलाल शहा व कै.मारवाडी वकील यांना या दोघांच्या मध्ये समन्वय साधून कै.चरणूकाका पाटील यांनी पवार साहेबांच्या माध्यमातून या कारखान्याची मुहूर्त रोवली आहे.
शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने विचार करून या कारखान्याची उभारणी झाली.परंतु आताची परिस्थिती खूप अवघड झाली आहे.
हे शेतकऱ्याचे मंदिर म्हणून आपण याकडे पाहतो कारण या कारखान्याच्या माध्यमातून जवळजवळ 50 हजाराच्या पुढे कुटुंब याच्यावर उदरनिर्वाह करत असतात.
त्यामध्ये शेतकरी,कर्मचारी, ऊस तोडणी कामगार,वाहतूक कामगार यासह अनेक जण या कारखान्यावर अवलंबून असतात.
कारखाना हा ग्रामीण व शहरी भाग सक्षम बनवायची एकमेक अर्थव्यवस्था आहे. जर तीच मोडीत निघाली तर येणारा काळ हा खूप अवघड आहे असे प्रतिपादन राहुल शहा यांनी केले.
प्रत्येकी 10 हजार रुपये घेतले त्याचा हिशोब हा अडीच कोटी रूपये आहे. हे पैसे सूतगिरणीच्या कामासाठी त्यांनी वापरल्याचा आरोप ही अजित जगताप यांनी केला.
हुकूमशाही पद्धतीने कारभार करणाऱ्या या लोकांना येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवा असेही जगताप यांनी शेवटी सांगितले.
यावेळी शिवानंद पाटील,राजेंद्र पाटील, पी.बी.पाटील,नंदकुमार पवार,दामोदर देशमुख, अशोक चौंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी रामकृष्ण नागणे,रामभाऊ वाकडे,अॅड. अर्जुनराव पाटील,यादाप्पा माळी,अरूण किल्लेदार, संभाजी गावकरे,प्रशांत यादव,शिवाजीराव नागणे,भारत पाटील,सुरेश कोळेकर,शशिकांत बुगडे,
प्रकाश गायकवाड,संजय चरणूकाका पाटील,महाविर ठेंगील,चंद्रशेखर कौंडूभैरी,मारूती वाकडे,भारत नागणे,सोमनाथ माळी,शरद पुजारी,विनोददादा पाटील,इन्नुस शेख,दादा गरंडे,नितीन पाटील,राजाभाऊ चेळेकर,नारायन घुले,
बळवंत पाटील,प्रकाश काळुंगे,रविंद्र पुजारी,जगदीश पाटील यांच्यासह श्री संत दामाजी शेतकरी समविचारी विकास आघाडी उमेदवार असलेले गोपाळ दगडू भगरे,
गौरीशंकर शरणाप्पा बुरकुल,मुरलीधर सखाराम दत्तू ,राजेंद्र चरणूकाका पाटील,भारत श्रीधर बेदरे,दयानंद कल्लाप्पा सोनगे,शिवानंद यशवंत पाटील,औदुंबर नारायण वाडदेकर,
रेवणसिद्ध चंद्रकांत लिगाडे,गौडाप्पा गोविंद बिराजदार,भिवा दाजी दोलतोडे,ज्ञानेश्वर भगरे,
बसवराज रामगोंडा पाटील,महादेव सखाराम लुगडे,
दिगंबर छगन भाकरे,प्रकाश भिवाजी पाटील, निर्मला तानाजी काकडे,लता सुरेश कोळेकर,तानाजी लक्ष्मण खरात,तानाजी दामू कांबळे हे उमेदवार आपल्या समर्थकांसह उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुनिल डोके यांनी तर उमेदवारांची ओळख व सुत्रसंचालन भारत मुढे यांनी केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज