टीम मंगळवेढा टाईम्स ।
सद्य परिस्थितीत संत दामाजी सहकारी साखर कारखान्यावर सुमारे २०० कोटीचे कर्ज असताना विद्यमान संचालक मंडळाने गेली दोन गाळप हंगाम यशस्वीरित्या पार पाडून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केलेला आहे.
काही वर्षापूर्वीही दामाजी कारखाना आर्थिक अडचणीत असताना स्व.सुधाकरपंत परिचारक यांनी पांडूरंग कारखान्याचा ऊस दामाजीस देवून सहकार्य केले होते.
तीच परंपरा जोपासत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी एन.सी.डी.सी. मार्फत दामाजी कारखान्यास रुपये १०० कोटी कर्ज मंजूर करण्यासाठी मोलाची मदत केली असून, या कर्ज मंजूरीमुळे दामाजी कारखान्यास नवसंजीवनी मिळणार असल्याची माहिती चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली.
दामाजी कारखाना सद्या अडचणीत असून कारखान्याकडे कोणताही उपपदार्थ निर्मिती प्रकल्प नाही. गेले दोन गळीत हंगाम चालू करतेवेळी कारखान्याच्या जेष्ठ मार्गदर्शकांनी बँकांमार्फत दामाजी कारखान्यास आर्थिक मदत केली. याशिवाय माजी आमदार प्रशांत परिचारक यांनीही बँकेमार्फत कारखान्यास आर्थिक सहकार्य केले.
कारखान्याने सर्वासाठी खुले सभासदत्व धोरण अवलंबिल्यामुळे त्यास शेतकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद देवून रुपये दहा कोटीच्यावर कारखान्याकडे भागभांडवल जमा झाले. दामाजी कारखाना अडचणीत असतानाही शेतकऱ्यांची शंभर टक्के एफ.आर.पी. कारखान्याने अदा केली असून, वाहतूक बिले अदा केली आहेत.
याशिवाय कामगारांचे पगार प्रत्येक महिन्याला वेळेवर केले आहेत. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाच्या कारभाराची साखर आयुक्तांनीही कौतुक केले आहे.
एन.सी.डी.सी. कर्ज मंजूरीमध्ये समाविष्ट असणारा सोलापूर जिल्ह्यातील संत दामाजी कारखाना हा एकमेव कारखाना आहे.
या कर्ज मंजूरीमुळे कारखान्यास नवसंजीवनी मिळणार आहे. कर्ज मंजूर करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल संत दामाजी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, व्हाईस चेअरमन तानाजी खरात तसेच संचालक मंडळाचे हस्ते प्रशांत परिचारक यांचा सत्कार करण्यात आला.
कर्ज मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सहकार्य लाभल्याचे शिवानंद पाटील यांनी सांगितले.
सत्कार प्रसंगी संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर आदी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज