मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पंढरपूरचे आमदार भारत भालके हे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद पाडून,कामगारांना देशोधडीला लावून लंडनला फिरायला गेल्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले.आणि कडाक्याच्या थंडीत मंगळवेढा व पंढरीचे राजकीय वातावरण तापले.कारखान्यावर कामगारांनी आंदोलन सुरु केले.मात्र नक्की आमदार भारत भालके कुठे आहेत? काय करताहेत हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
आमदार भालके हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवारांच्या सुचनेनुसार रविवारी रात्री दिल्लीला पोहचले.महाराष्ट्र सदनमध्ये मुक्काम केला. त्याठिकाणी भाजपचे खासदार गिरीश बापट यांची भेट झाली.सोमवारी सकाळी औरंगाबादचे खासदार इम्तीयाज जलील यांची भेट झाली. नंतर आमदार भालके यांनी एन एस डी सीच्या कार्यालयात फोन करून भेटायला येत असल्याची कल्पना दिली.
मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी दोन दिवस संसदेमध्ये महत्वाचे काम असल्याने आपण बुधवारी किंव्हा गुरुवारी आपल्या सोयीनुसार यावे असे कळविले . त्यामुळे दोन दिवस बसण्यापेक्षा आमदार भालकेंनी स्वार्थात परमार्थ उरकून घेण्याचे ठरविले . आमदार भालके हे सध्या हरिद्वार येथे देवदर्शनासाठी गेले आहेत . त्यानंतर ते रामदेव बाबांच्या आश्रमात मुक्काम करणार आहेत .उद्या देहरादून येथे देवदर्शनासाठी जाणार आहेत .बुधवारी आमदार भालके हे केंद्र सरकारच्या एन एस डी सी आणि एस डी एफ यांची संयुक्त बैठकीला जाणार आहेत.बंदावस्थेत असलेला श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी माझे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
श्री विठ्ठल कारखाना सुरु करण्यासाठी केंद्राच्या एन एस डी सी आणि एस डी एफ चे कॉमन कर्ज मिळविण्याचा आमदार भालके प्रयत्न करीत असल्याचे सांगितले . हे कर्ज मिळविताना कर्ज परतफेडचे जास्त हफ्ते मिळावेत . जेणे करुन फेडण्यास सोपे जाईल असा उद्देश आ . भालकेंचा आहे.
केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना कारखान्याच्या अडचणी सविस्तर समजावून सांगण्यासाठी स्वतः आमदार भालके हे कारखान्याचे चेअरमन या नात्याने उपस्थित राहणार आहेत.कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उस मोठ्या प्रमाणात आहे . पुढील गाळप हंगामात कारखाना सुरु झाल्यास आम्ही आपला कर्जाचा हफ्ता नियमितपणे भरू असा विश्वास अधिकाऱ्यांना देण्यासाठी , कारखान्याचे ताळेबंद मांडण्यासाठी कारखान्याचे लेखापरीक्षण पाहणारे चार्टर्ड अकाउन्टन्ट आणि कारखान्याचे अधिकारी देखिल दिल्लीत आहेत . बाकी लंडन वारी बद्दल बोलताना आमदार भालके म्हणाले , पुढील हंगामात कारखाना सुरु करण्याचा माझा प्रयत्न आहे . मात्र जिल्ह्यातील इतर बंद कारखाने सोडून फक्त विठ्ठललाच जाणूनबुजून टारगेट केले जात आहे . हे दुर्दैवी आहे . पंढरीतीलच नव्हे जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी पॅट , शर्ट परिधान करतात मग मी केला तर कुठे बिघडले ? मला जर लंडनला जायचे असते माझ्या घरी सांगितले असते , पदाधिकाऱ्यांना सांगितले असते . लपून लंडनला जाण्याची गरज काय ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज