टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यात खरीप पावसाने ओढ दिल्यामुळे चारा, पाणी, रोजगार, आणि जनतेच्या इतर प्रश्नावर आ.समाधान आवताडे यांनी 42 विविध शासकीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यासमवेत आजपासून तीन दिवसीय गाव भेट दौरा आयोजित करण्यात आला आहे.
आज दि.15 सप्टेंबर ते दि.17 सप्टेंबर या तीन दिवसात हा दौरा होणार आहे यापूर्वी तालुक्याच्या दक्षिण भागाचा दौरा केला. दौऱ्यात चारा छावणी सुरू करण्याची मागणी केली ती मागणीवर आ.अवताडे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला.
तर शाळकरी विद्यार्थ्यांनी एसटीच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली त्या मागणीची पूर्तता देखील झाले. याशिवाय पंचायत समिती, तहसील, महावितरण, आरोग्य, कृषी, उजनी, म्हैसाळ, पशुसंवर्धन, जि.प.बांधकाम, भूमिअभिलेख पी एम किसान योजना या विषयाच्या संदर्भात तक्रारी आल्या.
त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना आपले वर्तन सुधारणा किंवा कारवाईला सामोरे जावा अशी देखील तंबी दिली त्यामध्ये बहुतांश विषय मार्गी देखील लागले खरीप पाऊस लांबल्याने नदीकाठ कोरडा पडला.
यामध्ये पाटबंधारे विभागाने पाण्याचे नियोजन केले नसलेले समोर आले. नदीकाठचा ऊस चाऱ्यासाठी वापर अधिक झाला आहे त्यामुळे भविष्यात काय उपाययोजना कराव्यात व त्या लोकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी या गावाचा दौरा आयोजित करण्यात आला. त्यामध्ये नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात द्याव्यात असे आवाहन या करण्यात आले.
स्थानिक स्वराज्य संस्थेमधील जिल्हा परिषद ,पंचायत समिती व नगरपालिकेत लोकनियुक्त सदस्य नसल्यामुळे सगळा भार प्रशासकावर आहेत प्रशासकाकडून नागरिकांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहेत.
त्यामुळे या लोकांच्या तक्रारी वाढत आहे त्यामुळे या तक्रारीचे निरसन करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी या नात्याने आ.समाधान आवताडे यांनी यांच्या खांद्यावर पडली. त्यामुळे त्यांनी हा गाव भेट दौरा आयोजित केला.
मंगळवेढा तालुक्यातील ‘या‘ गावांचा दौरा केला जाणार
आज दि.15 सप्टेंबर माचनूर, ब्रह्मपुरी, मुंढेवाडी, रहाटेवाडी, तामदर्डी, तांडोर, सिद्धापूर, बोराळे, अरळी, नंदुर, डोणज, भालेवाडी,
दि.16 सप्टेंबर अकोले, गणेशवाडी, शेलेवाडी, आंधळगाव, लेंडवे चिंचाळे, शिरशी, गोणेवाडी, खुपसंगी, जालीहाळ, हाजापूर, डोंगरगाव, कचरेवाडी,
दि.17 सप्टेंबर बठाण,उचेठाण, मुडवी, धर्मगाव, ढवळस, शरद नगर,देगाव, घरनिकी, मारापुर,गुंजेगाव, महमदाबाद शे.लक्ष्मी दहिवडी
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज