टीम मंगळवेढा टाईम्स। राजेंद्र फुगारे
माढा शहराची पाणीटंचाई, एमआयडीसी व जातीनिहाय जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न असे लोकहिताचे प्रश्न हिवाळी अधिवेशनात माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले.
बुधवारी (दि.१८) झालेल्या नागपूर येथील अधिवेशनात आ. पाटील यांनी आपल्या माढा मतदार संघातील विकासासह मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाची आठवण करून देत
राज्यातील मराठा, धनगर, लिंगायत, महादेव कोळी, मुस्लिम या विविध जातीच्या आरक्षण संदर्भात योग्य मार्ग काढण्यासाठी राज्यात जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे.
उजनी धरण माढा तालुक्यात असून माढा शहरवासीयांना दहा दिवसातून एकदा पाणी मिळते. हा पाणी प्रश्न सोडविण्याबाबत त्यांनी मागणी केली आहे. मतदारसंघात असलेल्या मेंढापूर आणि मोडनिंब येथील एमआयडीसीला लवकरात लवकर मान्यता देण्याची मागणी केली.
एमएसपी वाढविण्यासाठी पाठपुरावा व्हावा
महाराष्ट्र राज्यात साखर कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. याच उद्योगावर राज्यातील मोठं आर्थिक गणित अवलंबून आहे. यासाठी हा साखर उद्योग चालविणे गरजेचे आहे. ऊस उत्पादक शेतकरी यांना लाभ होण्यासाठी साखरेचे भाव वाढविणे आवश्यक आहेत.
तरच उसाला भाववाढ देणे शक्य होते. यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारला एमएसपी वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याची मागणी आमदार अभिजित पाटील यांनी अधिवेशनात केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज