mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कामाची बातमी! दूध दरवाढीने पशुपालकांना दिलासा; दुधाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 7, 2022
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

टीम मंगळवेढा टाईम्स। 

कोरोना काळामध्ये १८ रुपयांपर्यंत घसरलेले दुधाचे दर सध्या ३५ रुपयांपर्यंत पोहोचल्यामुळे पशुपालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

मात्र, पशु पालनात सर्वात महत्त्वाची बाब असलेल्या पशु आहाराची म्हणजेच पेंडीचे दर ही आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर असल्याने पशु आहार आणि दुधाचे दर याचा मेळ घालताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.

मंगळवेढा तालुक्यात व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन घेतले जाते. पाणी आणि चाऱ्याची मुबलक उपलब्धता असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांकडे दोन-तीन दुधाळ जनावरे आहेतच.

त्यामुळे फक्त भोसे गावातूनच प्रतिदिन सुमारे १० हजार लिटर तर भोसे परिसरातून ४० हजार लिटर दूध असे एकूण ५० हजार लिटर दूध प्रतिदिन संकलित होत आहे.

कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण लॉकडाऊन केल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत असूनही त्यावेळी दुधाला फक्त १८ रुपये दर मिळत होता.

एका दुधाळ जनावरांचा प्रति दिन खर्च काढला असता हा दर परवडत नव्हता, तरीसुद्धा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने कोरोना कालावधीमध्ये जनावरांची जोपासणा केली.

सध्या जनजीवन पूर्वपदावर आले असल्यामुळे दुधाचे दर लक्षणीयरत्यिा वाढू लागले आहेत. सध्या ३.५, ८.५ या प्रतवारीच्या गाईच्या दुधाला ३५ रुपये प्रति लिटर दर मिळत आहे.

मागील वर्षी नोव्हेंबर २०२१ मध्ये हा दर २४ रुपयांवर होता. एकूणच गाईच्या खरेदी दुधामध्ये ११ रुपयांनी वाढ झाली असल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

परिसरामध्ये सध्या सोनाई, नेचर डिलाईट, रियल डेअरी आणि डायनामक्सि डेअरी या मोठ्या संस्थांकडून दूध संकलन करण्यात येत आहे.

मागणी आणि पुरवठा मध्ये तफावत येत असल्यामुळे परस्थितिीनुसार या संस्था दुधाच्या दरांमध्ये वाढ तसेच कपात करत असतात, मात्र सध्या दुधाची मागणी कायम असल्यामुळे दूध खरेदी दरामध्ये या संस्थांकडून वाढ होत आहे.

दुसरीकडे दूध वाढ होण्यासाठी जनावरांना सरकी, गोळी, खापरी, पेंड चारली जाते. या पेंडीचे दर ही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत.

पेंड तयार करण्यासाठी लागणाऱ्या मका पिकाच्या दरात कायम वाढ होत असल्यामुळे पेंडीची दरवाढ होत असल्याचे दुकानदारांचे मत आहे.

पेंडीच्या दरात पंधरा दिवसात ६० रूपयांनी वाढ

मागील एका महन्यिात पशुखाद्याच्या दरात सुमारे पाच ते दहा टक्के वाढ झाली आहे. सर्वाधिक खप असलेल्या गोपळी पेंडीच्या दरामध्ये मागील पंधरा दिवसात तब्बल ६० रुपयांनी वाढ झाली असून सध्या गोळी पेंडीचा दर १५०० ते १६०० रुपये आहे.

खापरी पेंड २३०० ते २७०० रुपये, गहू भुस्सा ९५० ते १०५० रुपये तर मका भरडा १४०० ते १५०० रुपये प्रति ५० किलो दर आहे. सरकीच्या दरात मात्र किरकोळ घट झाली असून सध्या १००० ते १४०० रुपये पर्यंत सरकी पेंड विकली जात आहे.

दर आणखी वाढणार!

दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे दुधाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ३.५ – ८.५ प्रतीच्या दुधाला ४० रुपये दर मिळण्याची शक्यता आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: गाईचे दूध

संबंधित बातम्या

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

June 2, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळ! कर्नाटक हादरवणारे गोविंदपूर हत्याकांड; सिद्धापूर कनेक्शन’ उघड, पोलिसांकडून एका संशयिताला अटक

June 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे; सोलापूरच्या नराधम मौलानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडितांचा आकडा वाढण्याची भीती

June 2, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पंढरपूरनजीकच्या ‘त्या’ विचित्र अपघाताने हिरावला उमदा तरुण; मंगळवेढ्यातील भावी वकिलाची मृत्यूशी झुंज अपयशी

June 2, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! जन्म दाखल्याच्या ऑर्डरसाठी २ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

June 2, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

June 1, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! सरकारने दिली बळीराजांची चिंता वाढविणारी अपटेड; मान्सून लांबणार, पेरणीची घाई करू नका…

June 1, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

सोलापूर विधानपरिषदेत भाजपचा मोठा डाव; प्रशांत परिचारकांना डावलून राजेंद्र राऊतांना उमेदवारी, परिचारक गट नाराज?

June 1, 2026
‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

May 31, 2026
Next Post
मंगळवेढ्यातील बेरोजगारांना आर्थिक सक्षम करणारा ‘दादा’ व सर्वसामान्यांच्या समस्या सोडविणारा हक्काचा माणूस : अनिल सावंत

शेतकरी बांधवांनो! भैरवनाथ शुगरचा उद्या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा; यांच्याहस्ते होणार शुभारंभ

ताज्या बातम्या

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

June 2, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळ! कर्नाटक हादरवणारे गोविंदपूर हत्याकांड; सिद्धापूर कनेक्शन’ उघड, पोलिसांकडून एका संशयिताला अटक

June 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे; सोलापूरच्या नराधम मौलानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडितांचा आकडा वाढण्याची भीती

June 2, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पंढरपूरनजीकच्या ‘त्या’ विचित्र अपघाताने हिरावला उमदा तरुण; मंगळवेढ्यातील भावी वकिलाची मृत्यूशी झुंज अपयशी

June 2, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! जन्म दाखल्याच्या ऑर्डरसाठी २ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

June 2, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

June 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..