टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील सलगर खु.येथे एका ४५ वर्षीय इसमाने अज्ञात कारणावरून लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली असून म्हाळाप्पा सुखदेव माने असे त्या आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
दरम्यान, पोलिसांनी आकस्मात मयत अशी या घटनेची नोंद केली आहे.यातील खबर देणारे सुखदेव माने यांचा
मुलगा म्हाळाप्पा माने यांनी सकाळी ९.०० ते १०.०० च्या दरम्यान शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली.
आत्महत्येचे कारण नेमके समजू न शकल्याने पोलिस त्याचा कसून तपास घेत आहेत. अधिक तपास पोलिस हवालदार काळे हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज