मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सांगोल्याचे आमदार अॅड.शहाजीबापू पाटील व श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी एका विक्रमवीर विवाह समारंभात भेटून एकमेकांना आलिंगन दिल्याचा फोटो सोशल मिडीयावर व्हायलर झाल्यानंतर सर्वत्र या भेटीचीच जोरदार चर्चा होत आहे.
दरम्यान ,या भेटीदरम्यान आ.शहाजीबापू पाटील यांनी पुढच्या वेळेस तुम्हाला सोबत घेवून विधानसभेत जावू असा कानमंत्र दिल्याचीही चर्चा पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात सुरु आहे.
समाधान आवताडे यांनी दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढविली आहे. तर या दोन्ही वेळेस त्यांना पराभव पत्करावा लागला आहे तर शहाजीबापू पाटील यांनी अनेक वेळा विधानसभेची निवडणूक लढविली मात्र त्यांनी दोन वेळेला विजय मिळविला आहे.सुरुवातीस ते काँग्रेसकडून आमदार झाले त्यावेळी त्यांनी विक्रमवीर आमदार डॉ.गणपतराव देशमुख यांचा पराभव केला तर नुकत्याच झालेल्या निवडणूकीत त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवून गणपतरावांचे नातू डॉ.अनिकेत यांचा पराभव केला आहे.
तर समाधान आवताडे यांनी गेल्या पंचवार्षिकला शिवसेनेकडून उमेदवारी लढविली मात्र यावेळी अपक्ष निवडणूक लढवूनही त्यांनी लक्षणीय अशी मते मिळविली.दोन प्रयत्नात अपयश आले असले तरी तिसरी झेपही यापेक्षाही मोठी असेल अशी अपेक्षा आवताडे समर्थकांना आहे. त्यातच आ . पाटील यांचेशी झालेल्या भेटीमुळे आवताडे यांचे मनोबल वाढल्याचीही चर्चा होत आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज