टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरांमध्ये शिवप्रेमी चौक येथे लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवणे संदर्भात जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे प्रस्ताव सादर केलेला असून त्यामध्ये काही त्रुटी कळवण्यात आलेल्या आहेत.
आचारसंहिता असल्याकारणाने सदर त्रुटीची पूर्तता नगरपरिषद व टाऊन प्लॅनिंग ऑफिस कडून झालेली नाही.
आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही सदर कार्यालयातील अधिकाऱ्यांना समक्ष भेटून पूर्तता करण्याबाबत चर्चा केली असून लवकरात लवकर त्रुटीची पूर्तता करण्याचे त्यांनी आम्हास सांगितले आहे.
तसेच जमा झालेल्या देणगीच्या खर्चा संदर्भात व पुतळा बसवणे परवानगी संदर्भात मंगळवेढा शहरातील सर्व शिवभक्तांची बैठक दिनांक 30 जून रविवारी सकाळी 11 वाजता शिवप्रेमी चौक शिवालय येथे घेण्यात येणार आहे.
तरी सर्व शिवभक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन पुतळा समितीचे अध्यक्ष अजित जगताप व सचिव राहुल सावंजी यांनी केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज