टीम मंगळवेढा टाईम्स ।
पावसाचे कारण देत राज्यातील 24 हजार 710 सहकारी संस्थेच्या निवडणुका पुढे ढकल्याचा निर्णय सहकार, पणव व वस्त्रोद्योग विभागाने घेतला आहे. त्यामुळे सहकारी संस्थेच्या निवडणुका तीन महिने पुढे गेल्या आहेत.
राज्यातील 14 जिल्ह्यात 100 टक्क्यापेक्षा जास्त पाऊस पडला आहे. तर पाच जिल्ह्यात 70 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतेक शेतकरी,
सभासद हे खरीप हंगामातील पेरणीसाठी व्यस्त आहेत. ते शेतकरी, सभासदांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता येत नाही.
हे कारण देत सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने सहकारी संस्थेच्या निवडणुका तीन महिन्यांसाठी पुढे ढकलेल्या आहेत.
त्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितींना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 73 क मधील तरतुदीनुसार
पावसाळ्यांच्या हंगामात सहकारी संस्थांची निवडणूक पुढे ढकलण्याचा अधिकार शासनास आहे. त्यामुळे पणन विभागाने तीन महिन्यांसाठी सहकारी संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलेल्या आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज