टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील छावणी चालकांची उद्या सकाळी 11 वाजता मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांच्या पुढाकाराने बैठक आयोजित केली आहे.
अनिल सावंत यांनी पुढाकार घेतला असल्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर आता तोडगा निघणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
2019 च्या दुष्काळात तालुक्यामध्ये जनावराची उपासमार होऊ नये म्हणून छावण्या सुरू करण्यात आल्या. त्यामध्ये उपस्थित जनावराची दैनिक तपासणी तलाठी,मंडलाधिकारी,ग्रामसेवक,पशुधन अधिकारी,नगरपालिका,सहायक निबंधक,कृषी,उजनी,कोषागार,खात्याच्या अधिकार्याच्या उपस्थितीत ऑनलाईन हजेरी,सीसीटीव्ही कॅमेरे,जनावरांची देखरेख व त्यांचे व्यवस्थापन जनावरा दिल्या जाणार्या सुविधा वर लक्ष ठेवण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली.
मात्र दुष्काळ संपल्यानंतर छावण्या बंद करण्याचा अंतिम टप्प्यात मंगळवेढा व सांगोला या तालुक्यातील जवळपास 38 कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहेत.
सदरचा हंगामात छावणी सुरू करण्यासाठी शासनाने अनेक अटी घालून देण्यात आल्या होत्या या जाचक अटीमुळे सुरूवातीला अनेकांनी प्रस्ताव टाकण्यासाठी विलंब केला तरी देखील काहींनी या जाचक अटींचा स्वीकार करत मुक्या जनावराची गैरसोय होऊ नये म्हणून चारा छावण्या सुरू केल्या
अटीच्या पूर्ततेसाठी दररोज महसूल खात्याच्या कर्मचार्याकडून तपासणी केली जात होती त्यामुळे या छावण्यांमध्ये नियमाचा अधिक खोडा घातल्यामुळे उशिरा सुरू झाल्या सुरुवातीच्या काळात 300 जनावरांची अट घातली त्यामुळे 300 ची संख्या होईपर्यंत छावणी चालकाला पदरमोड करावी लागली.
त्यानंतरची संख्या ग्राह्य धरण्यात आली आणि बंद करतेवेळी कमी झालेली जनावरे झाल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी व संबंधित अधिकार्यांनी छावण्या बंद करू नयेत अशी सूचना देण्यात आल्या होत्या.
त्यामुळे छावणी चालकांनी कमी जनावरे देखील स्वखर्चाने जतन केले आणि त्यामुळे कमी जनावरे संख्या महसूल खात्याने ग्राह्य धरण्यात आली नसल्याची ओरड सुरू झाली.
जनावरे जतन करण्यासाठी उधारीवर घेतलेल्या चारा पशुखाद्य व इतर खर्चाची देयके छावणी चालकांना देणेकराच्या दररोजच्या तगाद्यामुळे स्थानिक संस्था व बँकांची कर्जे काढून अदा करावी लागली आहेत.
अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील एक शिष्टमंडळ उद्या होणाऱ्या बैठकीसाठी आज मुंबईला जाणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज