टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून मरवडे ग्रामपंचायत कडे पाहिले जाते. मरवडे ग्रामपंचायतवर सन 2020-2021 मध्ये गावविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर आघाडीतील प्रमुख यांनी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन सर्वांना काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली.
मरवडे ग्रामपंचायत मध्ये सरपंच पद हे सर्वसाधारण पुरुष असल्यामुळे नितीन घुले, सुमन गणपाटील, पूनम मासाळ, अंजना चौधरी यांना सरपंच म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली व त्या पद्धतीने त्यांना कामकाजाचा कालावधी देण्यात आला होता.
तसेच निवड प्रक्रिये वेळी हे सर्व उपस्थित होते. सौ.मीनाक्षी सुर्यवंशी यांनी या पंचवार्षिक मध्ये 1 वर्ष उपसरपंच पदावर काम केले आहे. त्यामुळे सर्व प्रमुख व सदस्यांनी सर्वानुमते सौ.मीनाक्षी सुर्यवंशी यांच्या नावाला पसंदी दिली.
गावविकास आघाडीची सत्ता गावात आल्यापासून गेल्या 4.5 वर्षात 6 कोटींची विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत व सदर कामाची माहिती पुस्तिका प्रकाशित करून सर्वांना माहिती देण्यात आली आहे. ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून सुर्यवंशी कुटुंबात पहिल्यांदा सरपंच पद मिळाले आहे.
ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच निवड प्रक्रिया अध्यासी अधिकारी सौ.गुघे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मरवडे ग्रामपंचायतचे सरपंच पद सौ.अंजना चौधरी यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झाले होते.
त्यामुळे सरपंच पदाच्या शर्यतीत एकमेव अर्ज सौ.मीनाक्षी सुर्यवंशी यांनी भरल्यामुळे सदरची सरपंच निवड अविरोध झाल्याचे अध्यासी अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, तलाठी यांनी सांगितले.
तसेच उपसरपंच श्रीमती.मिराताई जाधव माजी उपसरपंच सौ.रेश्मा शिवशरण, कु.दीक्षा शिवशरण उपस्थितीत होते.
गावविकास आघाडीचे मार्गदर्शक नामदेव गायकवाड सर, नामदेव बापू घुले, लतिफभाई तांबोळी, दत्तात्रय गणपाटील, श्रीकांत गणपाटील, संदीप सूर्यवंशी यांनी सरपंच पदी निवड झाल्याबद्दल सौ.मीनाक्षी सुर्यवंशी यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
सदर निवड प्रसंगी गावातील नामदेव बापू घुले, सुनील गायकवाड सर, बापूराव सुर्यवंशी, तानाजी सुर्यवंशी, दामोदर घुले, युवराज सुर्यवंशी, पांडुरंग जाधव, दत्तात्रय सुर्यवंशी, परमेश्वर सुर्यवंशी, सिध्देश्वर सुर्यवंशी, सचिन घुले, हैदर केंगार, शिवाजी सुर्यवंशी,
अनिल गणपाटील, संभाजी सुर्यवंशी, निलेश स्वामी, प्रशांत सूर्यवंशी, राजू सुर्यवंशी, सतीश सुर्यवंशी, आश्विन शिवशरण, सुभाष शिवशरण, अनुप सुर्यवंशी, विक्रमसिंह पवार, समाधान सुर्यवंशी, अमोल लांडगे आदी नागरिक व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज