टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढेकरांवर पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे, शहरातील पाणीपुरवठा आज बंद राहणार आहे.
मंगळवेढा शहरातील दामाजी चौकात पाणी पुरवठा करण्यात येणारी मेन पाईप लाईन दुरूस्तीचे काम पूर्ण झाले नसल्याने आज शनिवार दि.१० डिसेंबर रोजीचा
सकाळचा पाणी पुरवठा होणार नाही, तरी शहरातील नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरून मंगळवेढा नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन कर निरीक्षक विनायक साळुंखे यांनी केले आहे.
दरम्यान, मंगळवेढा तालुक्यात यंदा भरपूर प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे शहराची पाण्याची समस्या मिटली आहे, मात्र शहरात काही ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू असल्याने मंगळवेढेकरांना कारण मात्र पाणी जपून वापरावे लागणार आहे.
काव्यप्रेमी साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन
काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या वतीने सन २० – २१ वर्षापासून मराठी साहित्य क्षेत्रातील नामवंत व नवोदित साहित्यिकांना उत्कृष्ट कविता/गझलसंग्रह, कादंबरी आणि कथा संग्रहासाठी काव्यप्रेमी साहित्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.
याहीवर्षी प्रवेशिका मागविण्यात येत असून त्यासाठी खालील पुरस्कार देण्याचे आयोजन करण्यात येत आहे. उत्कृष्ट कविता गझलसंग्रहासाठी कालकथित कोकिळा मिलिंद शेजवळ स्मृती पुरस्कार,
उत्कृष्ट कथासंग्रहासाठी पैगंबरवासी रहिमानशास्त्री शेकुसाहेब शेतसंदी स्मृती पुरस्कार व उत्कृष्ट कादंबरीसाठी स्व. जयवंती राजाराम तावडे स्मृती पुरस्कार. प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप १५५१ /- रोख स्वरूपात १००० / – पुस्तक स्वरूपात तसेच स्मृती चिन्ह व मानपत्र असे आहे.
पुढील नियम व अटीनुसार लेखक व कवींनी पुस्तके पाठवावेत. १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या वर्षभरात प्रकाशित झालेली पुस्तकेच सदर पुरस्कारासाठी पाठवता येतील. बालसाहित्य अपेक्षित नसतील, पुस्तके दिनांक २५ डिसेंबर २०२२ पर्यंत पोहचणे आवश्यक आहे.
प्रकाशित पुस्तकाच्या २ प्रती पाठविणे अपेक्षित असून पुस्तकाच्या मुखपृष्ठावर वा अंतरंगात कोणत्याही स्वरूपाचा मजकूर न लिहता काव्यप्रेमी शिक्षक मंच, रत्नागिरी, द्वारा- संजय बाळकृष्ण कुळये, ए-२, आम्रपाली कॉम्प्लेक्स, निवखोल रोड, रत्नागिरी, पिन – ४१५६१२ या पत्त्यावर पाठवावेत. काव्यप्रेमी शिक्षक मंचाचे पदाधिकारी, राज्य समिती सदस्य यांना या स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही.
संपूर्ण भारतातील मराठी साहित्यिक आपले साहित्य पाठवू शकतील. पुरस्कार निवडीची घोषणा दि. २ जानेवारी २०२३ रोजी विविध दैनिके, काव्यप्रेमी युट्यूब चॅनल, व्हाट्सअप समूह व फेसबुक पेजवर जाहीर करण्यात येईल.
पुरस्कार निवडीसाठी कोणत्याही स्वरूपाची विनंती / पोस्ट / चौकशी / प्रलोभने अवैध असतील. दिनांक ७ व ८ जानेवारी २०२२ रोजी रत्नागिरी येथे संपन्न होणाऱ्या काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या तेराव्या राज्यस्तरीय काव्यमहोत्सवात विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल.
अधिक माहितीसाठी ९०२१४११६७१ अथवा ७३९७८१३२३६ या फोन क्रमांकावर संपर्क साधावा असे संस्थेचे अध्यक्ष आनंद घोडके व कालिदास चवडेकर यांनी कळवले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज