मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील कागस्ट येथून एक चोवीस वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाली असल्याची नोंद मंगळवेढा पोलिसात झाली आहे.
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
दरम्यान या बेपत्ता महिलेचा शोध पोलिस घेत आहेत . दि . २६ जानेवारी रोजी सकाळी ९ . ३० च्या दरम्यान गावातील एका महिलेसोबत सदर २४ वर्षीय महिला कामाला जाते असे सांगून घरातून निघून गेली .
रात्री उशीरापर्यंत ती घरी परत न आल्याने कुटुंबियांनी सर्वत्र तसेच तीच्या माहेरी सिध्दापूर येथे तीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही . कुटुंबियांनी सदर विवाहिता बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली आहे .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज