मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा शहरानजीक असलेल्या बोराळे रोड येथे विजेच्या धक्क्याने रेश्मा सचिन उन्हाळे हिचा मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , सदर महिला शनिवार दि . ८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ . ३० च्या सुमारास बोराळे रोड येथील राहते घरासमोर असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ इलेक्ट्रीक मोटारीजवळ असलेले सॉकिट काढत असताना तीच्या उजव्या हाताला जोराचा विजेचा धक्का बसला.
ती बेशुध्द होवून खाली पडली.तीच्या डोकीस पाठीमागे मार लागल्याने उपचारासाठी तीला मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.
मात्र उपचारापुर्वीच ती मयत झाली . याची खबर तीचा पती सचिन उन्हाळे यांनी पोलिसांत दिली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार राऊत हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज