टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील भोसे येथील एका 22 वर्षीय विवाहित महिलेने अज्ञात कारणासाठी स्लॅबच्या लोखंडी हुकास घरामध्ये साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या करण्याची घटना घडली असून या घटनेची आकस्मात मयत अशी पोलिसात नोंद झाली आहे.
दरम्यान,नुतन पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी घटनास्थळी भेट देवून घटनेमागील कारणमिमांसा जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील खबर देणारे भारत खडतरे यांची मयत उज्वला गणेश खडतरे (वय 22) ही सुन असून दि.12 रोजी दुपारी 2.30 वा.
भोसे येथील राहते घराच्या स्लॅबच्या लोखंडी हुकास साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिलेल्या खबरमध्ये म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज