टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी गर्दी टाळा असं आवाहन सरकार वारवार करत आहे. सोशल डिस्टन्सिंग हा कोरोनाला दूर ठेवण्याचा एक महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे सरकारनेही सगळ्या कार्यक्रमांवर बंधणेही घातले आहेत. मात्र सतत सूचना देऊनही अनेक जण या नियमांचं उल्लंघन करत असल्याच्या घटना घडत आहेत. लॉकडाऊन असतांनाही फाईव्हस्टार हॉटेलात लग्नाला गेलेल्या दोघांचा मृत्यू झालाय तर 25 जणांना कोरोना झाल्याचं उघड झालं आहे. Marriage held at Five Star Hotel in Pune in Lockdown, Corona kills two, 25 positive
त्यामुळे पोलिसांनी लॉकडाऊनच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंचतारांकित हॉटेलला नोटीस दिली असून आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.नगर रोडवरच्या ‘हयात रिजन्सी’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी हॉटेलला नोटीस दिली आहे.
तब्बल 250 लोकांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला. शिवसेनेचे उपशहर प्रमुख आनंद गोयल यांनी याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.राज्यात मंगळवारी पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल अकरा हजार 88 नवीन रुग्णांची भर पडली आहे.
त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ही 5 लाख 35 हजार 601 एवढी झाली आहे. तर दिवसभरात 256 रुग्णांचा मृत्यू झालाय. राज्यातील मृत्युदर 3.42 टक्के इतका आहे. राज्यात आज 10 हजार 14 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. राज्यात आजपर्यंत तीन लाख 68 हजार 435 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 68.79 टक्के एवढं झालं आहे.
राज्यात सध्या दहा लाख 4233 व्यक्ती घरात विलीगिकरणात आहेत तर 35 हजार 648 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरण यामध्ये आहेत. एक लाख 48 हजार 553 ऍक्टिव्ह रुग्ण संख्या आहे. आज ठाणे महापालिका क्षेत्रात 173 कोरोणा पॉझीटिव्ह रुग्णांची नोंद झाली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज