टीम मंगळवेढा टाईम्स ।
मराठा आरक्षणासाठी उद्या बुधवार दि.२ जून रोजी मंगळवेढा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवालय येथील मूर्ती जवळ सकल मराठा समाजाच्या वतीने १ दिवसीय सकाळी ९ ते ५ पर्यंत कोरोनाचे सर्व नियम पाळून लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली.
आवताडे म्हणाले, ५० % च्या वरती आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही आसे सांगत मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारले त्यानंतर सत्ताधारी व विरोध पक्ष स्वतः च्या जबाबदारी झटकत एकमेकावरती आरोप करीत राहिले.
परिणामी छत्रपती संभाजी महाराजांनी २७ तारखेला आपली भूमिका स्पष्ट करू असे सांगितले आहे. छत्रपती संभाजी महाराजानी सर्वच राजकीय पक्षाचा प्रमुखांची भेट घेऊन आपली भूमिका मिडीया समोर स्पष्ट केली. यामध्ये त्यांनी केद्रं सरकार व राज्य सरकार या दोन्ही कडेही आपल्या काही मागण्या ही मांडल्या आहेत.
छत्रपती संभाजी महाराज यांनी आपली भूमिका मांडत आसताना कोणाचीही बाजू न घेता राजकारण विरहीत भुमिका घेतली आहे.
म्हणूनच या भुमिकेला पाठिंबा व मराठा आरक्षण लढ्याचे एक पाऊल म्हणून सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे आजी -माजी अध्यक्ष व काही मराठा समाजातील पद्धाधिकारी यांचा समवेत बुधवार दि २ जून रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवालय येथील मूर्ती जवळ सकल मराठा समाजाच्या वतीने १ दिवसीय लाक्षणिक उपोषण सकाळी ९ ते ५ पर्यंत कोरोनाचे सर्व नियम पाळून करण्यात येणार आहे.
तसेच ६ जून रोजी छत्रपती संभाजी महाराज रायगडावरती जो निर्णय घेतील त्यानुसार पुढील मराठा आरक्षणाची दिशा ठरवली जाईल असे सिद्धेश्वर आवताडे यांनी सांगीतले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज